तुमच्यासाठी काय पण..! निक जुनं घर विकून आता प्रियंकासाठी घेतोय कोटींची प्रॉपर्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:29 IST2019-08-07T18:29:05+5:302019-08-07T18:29:20+5:30

प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनस लॉस अँजेलिसमध्ये नवीन घर विकत घेण्याचं प्लानिंग करत आहेत.

Priyanka Chopra and Nick Jonas looking for new lavish home after selling his old home | तुमच्यासाठी काय पण..! निक जुनं घर विकून आता प्रियंकासाठी घेतोय कोटींची प्रॉपर्टी

तुमच्यासाठी काय पण..! निक जुनं घर विकून आता प्रियंकासाठी घेतोय कोटींची प्रॉपर्टी


बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा व निक जोनस यांच्या प्रॉपर्टी व लक्झरी लाईफ कुणापासून लपलेली नाही. प्रियंका व निक यांच्या लक्झरी लाइफस्टाईलचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. आता सूत्रांकडून समजतंय की, प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनस लॉस अँजेलिसमध्ये कोटींचे नवीन घर विकत घेण्याचं प्लानिंग करत आहेत. 

टीएमझेडच्या रिपोर्टनुसार निक जोनसने लॉस अँजेलिसचं जुनं घर विकलं आहे, जिथे तो लग्नाच्या आधी रहात होता. आता निक प्रियंकासोबत राहण्यासाठी नवीन घर विकत घेण्यासाठी शोधत आहेत. नवीन घरासाठी प्रियंका व निकचं बजेट २० मिलियन डॉलर (जवळपास १४१ कोटी) आहे. नवीन घर विकत घेण्यासाठी निकने लॉस अँजेलिसमधील जुनं घर विकल आहे. 


रिएल स्टेटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज तकने वृत्तात सांगितलंय की निकने जुनं घर ६.९ मिलियन डॉलर (जवळपास ४८.९१ कोटी)ला विकलं आहे. रिपोर्ट्समध्ये हेदेखील सांगितलं आहे की निकने त्यांचं हे घर एप्रिल, २०१८ साली ६.५ मिलियन डॉलर (जवळपास ४६.०७ कोटी)मध्ये विकत घेतलं होतं.


निकच्या जुन्या घरात पाच बेडरूम, ४ ते ५ बाथरूम होते. निकच्या घरात एक शानदार पूलही होता आणि त्याच्या घरातून पर्वत व निसर्ग दिसत होते. प्रियंका व निक अद्याप कोणत्या दुसऱ्या घरात शिफ्ट झाले नाहीत. ते अद्याप नवीन घर शोधत आहे. 


प्रियंका व निक ही जोडी फक्त भारतातच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय आहे.

सोशल मीडियावर प्रियंका व निकच्या लाईफस्टाईलबद्दल जाणून घेण्यासाठी जगभरातील चाहते खूप उत्सुक असतात.

सोशल मीडियावर प्रियंका व निकचे आऊटिंग, शॉपिंग व पार्टी असे सर्व फोटो व्हायरल होत असतात. 

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas looking for new lavish home after selling his old home