​फॅमिली वेडिंगदरम्यान एकत्र दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 10:26 IST2018-06-12T04:54:29+5:302018-06-12T10:26:23+5:30

 प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास रिलेशनशिपमध्ये आहेत, आता याला पुराव्याची गरज राहिलेली नाही. सध्या प्रियांका व निक ...

Priyanka Chopra and Nick Jonas look together in Family Wedding! You'll be surprised by the photos !! | ​फॅमिली वेडिंगदरम्यान एकत्र दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!!

​फॅमिली वेडिंगदरम्यान एकत्र दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!!

 
्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास रिलेशनशिपमध्ये आहेत, आता याला पुराव्याची गरज राहिलेली नाही. सध्या प्रियांका व निक ज्याप्रमाणे एकत्र वेळ घालवत आहेत, त्यावरून तरी हाच अंदाज निघतो. प्रियांका व निकचे ताजे फोटो पाहिल्यानंतर तर या दोघांत नक्की काहीतरी खिचडी शिजतेय, याची खात्री पटते. होय, प्रियांका व निक या दोघांचे ताजे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेत, निकच्या कझिनच्या लग्नाचे. या लग्नाला प्रियांकाही हजर होती. 



दोन दिवसांपूर्वी निकच्या हातात हात घालून प्रियांका न्यूयॉर्कच्या विमानावर दिसली होती. हे दोघे न्यूजर्सीला गेले होते. निमित्त होते निकच्या कझिनचे लग्न.





होय, या लग्नात प्रियांका व निक दोघांनीही एकमेकांना एक क्षणही दूर केले नाही. गोल्डन ड्रेसमधील प्रियांकाने निकसोबत या लग्नात प्रचंड मज्जामस्ती केली.



तूर्तास निकने आपल्या फॅमिली वेडिंगमध्ये प्रियांकाला सोबत घेऊन जाणे, यावरून अनेक अंदाज बांधले जात आहेत.



निक व प्रियांका यांनी अद्याप आपल्या रिलेशनशिपबाबत अधिकृत घोषणा केली नाही. पण दोघेही कधी नव्हे इतके बिनधास्त हातात हात घेऊन फिरताना बघितल्यावर कुणापासूनही काहीही लपून राहणे शक्य नाही.





तूर्तास या लग्नातील प्रियांका व निकचे काही फोटो आमच्याकडे आहेत. स्वत: निकने त्याच्या सोशल अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो बघा आणि काढायचा तो अंदाज काढा.





अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता.
यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडलेली नाही. 
२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती.  


ALSO READ :  प्रियांका चोप्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; प्रेक्षकच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रींचाही होऊ शकतो संताप !

 निक हा अमेरिकन गायक आणि अभिनेता आहे. ८-९ वर्षांचा होता तेव्हापासून निक अभिनय करतोय. यादरम्यान अनेक नाटकांत त्याने अभिनय केला. २००२ मध्ये निकने वडिलांसोबत मिळूल ‘जॉय टू द वर्ल्ड’ नावाचे एक गाणे लिहिले आणि अशाप्रकारे निकने अभिनयाशिवाय संगीत क्षेत्रात पाऊल ठेवले. निकचे वडीलही एक गीतकार, गायक आणि रंगभूमी कलाकार होते. आई साईन लँग्वेजची टीचर होती़ सोबतच गायिका होती. म्हणजेच अभिनय आणि संगीताचा वारसा निकला घरातूनचं मिळाला होता. २००५मध्ये निकले पॉल केविन जोनास आणि जोसेफ एडम जोनास या दोन भावांसोबत जोनास ब्रदर्स नावाचा पॉप रॉक बँड बनवला. जोनास ब्रदर्सने चार अल्बम रिलीज केले आहेत.

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas look together in Family Wedding! You'll be surprised by the photos !!