प्रियंका चोप्रा व निक जोनासचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, Video पाहून व्हाल दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 16:16 IST2019-02-13T16:16:00+5:302019-02-13T16:16:59+5:30

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्राचा हॉलिवूड चित्रपट 'इज नॉट इट रोमांटिक' १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रियंका योगा प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

Priyanka Chopra and Nick Jonas are making this video viral, watching the video will be a rage | प्रियंका चोप्रा व निक जोनासचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, Video पाहून व्हाल दंग

प्रियंका चोप्रा व निक जोनासचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल, Video पाहून व्हाल दंग

निक जोनासप्रियंका चोप्रा सोशल मीडियावरील ट्रेडिंग कपल आहेत. दोघेही नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. नुकतेच प्रियांका चोप्राचा आगामी हॉलिवूडपट 'इज नॉट इट रोमँटिक'चा प्रीमियर लॉस अँजेलिसला ठेवण्यात आला होता. त्यावेळी निक जोनासने प्रियंकाला कॅमेऱ्यासमोर किस केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. आता या प्रीमियर वेळचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे. जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रियंकाचा तोल जाऊन पडणार होती. मात्र तिला निकने सावरले. 


व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रियंकाचा ड्रेस तिच्या हिल्समध्ये अडकला आणि तिचा तोल जाणार होता. मात्र निकने तिला पडण्यापासून वाचवले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून निक परफेक्ट नवरा असल्याचे बोलले जात आहे.

इज नॉट इट रोमँटिक या हॉलिवूडपटात प्रियंकाचा कॅमिओ असला तरीदेखील तिची खूप चर्चा होत आहे.  इज नॉट इट रोमँटिक हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यात प्रियंका योगा प्रशिक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या प्रीमियरनंतर प्रियंकाला पत्रकारांनी विचारले की, कोणत्या सिनेमात किंवा गाण्यात तू निकसोबत काम करणार का? यावर प्रियंका म्हणाली की, याबद्दल मला माहित नाही. आम्ही एकत्र काहीतरी करणार आहोत. 

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas are making this video viral, watching the video will be a rage