गोव्यात लंच करताना दिसले प्रियांका चोप्रा व निक जोनास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 09:24 IST2018-06-26T09:16:44+5:302018-06-26T09:24:26+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या गोव्यात आहेत.  फॅमिलीतील काही सदस्य आणि काही अतिशय जवळचे मित्र यांच्यासोबत दोघेही मस्तपैकी ...

Priyanka Chopra and Nick Jonas appear to have lunch in Goa | गोव्यात लंच करताना दिसले प्रियांका चोप्रा व निक जोनास!

गोव्यात लंच करताना दिसले प्रियांका चोप्रा व निक जोनास!

रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या गोव्यात आहेत.  फॅमिलीतील काही सदस्य आणि काही अतिशय जवळचे मित्र यांच्यासोबत दोघेही मस्तपैकी मज्जा करताहेत. खरे तर प्रियांका व निक हे गोव्यात कुठे आहेत, हे कुणालाही ठाऊक नव्हते. पण आता प्रियांका व निक विद गँगचा पहिला फोटो समोर आला आहे. होय, या फोटोत प्रियांका, निक, परिणीती व पीसीच्या अन्य दोन मैत्रिणी असे सगळे लंच एन्जॉय करताना दिसताहेत. निक प्रियांकाच्या बाजूला बसलाय आणि पुन्हा तेच, त्यांची डायनिंग टेबलवरची केमिस्ट्रीही बरेच काही सांगणारी आहे.



खरे तर भारतात प्रियांकाने निकसोबत डेटवर जातांना फॅमिली डेटींगचा पर्याय का निवडावा, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. या आॅफिशिअल डेटवर आपले नातेही आॅफिशिअल करण्याचा दोघांचाही प्लान होता की आहे, माहित नाही ते लवकरचं समोर येईल. तोपर्यंत हा फोटो आपण बघुयात.
या फोटोसोबत प्रियांका आणि तिची चुलत बहीण परिणीती या दोघींचा पावसाचा आनंद लुटतानाचा व्हिडिओ पाहायलाही विसरू नका.
 



















ALSO READ : निक जोनास होणार का मधू चोप्रा यांचा जावई? काय म्हणते प्रियांकाची आई?? 

गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूड अभिनेता निक जोनस याच्याशी तिचे नाव जोडले जात आहे, तर प्रियांकाकडून अद्यापपर्यंत तिच्या या रिलेशनबद्दल कुठल्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य समोर आले नाही. गेल्या आठवड्यात प्रियांकाला निकच्या कजिनच्या लग्नातही बघण्यात आले होते. याठिकाणीदेखील दोघांमध्ये एक वेगळ्याच प्रकारची केमिस्ट्री बघावयास मिळाली. गदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक केला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीत दिसले होते. या पार्टीत अनेकजण होते. पण प्रियांका व निक यांनी एकमेकांची सोबत सोडलेली नाही. 
२०१७ मध्ये ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर प्रियांका व निक सोबत दिसले होते. निकची ‘डेट’ बनून प्रियांका या रेड कार्पेटवर उतरली होती. प्रियांका व निकची ओळख अमेरिकन टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती.














  

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas appear to have lunch in Goa