OMG! ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियर पडली को-स्टार रोशन अब्दुलच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 10:56 IST2019-04-24T10:55:45+5:302019-04-24T10:56:07+5:30

आपल्या अदांनी घायाळ करणारी ‘विंक गर्ल’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय,  ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रोशन अब्दुल रहुफसोबत प्रिया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

is priya prakash varrier and oru adaar love co-star roshan abdul rahoof in a relationship | OMG! ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियर पडली को-स्टार रोशन अब्दुलच्या प्रेमात?

OMG! ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियर पडली को-स्टार रोशन अब्दुलच्या प्रेमात?

ठळक मुद्दे‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत दिसली होती.

इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही लाखो हृदयांवर राज्य करते. तिची प्रत्येक अदा चाहत्यांना वेड लावते. ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली. आपल्या अदांनी घायाळ करणारी ही ‘विंक गर्ल’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय,  ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील तिचा को-स्टार रोशन अब्दुल रहुफसोबत प्रिया रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


अलीकडे प्रियाने रोशनच्या बर्थ डेचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोनंतर दोघांच्याही अफेअरच्या बातम्यांना आणखी हवा मिळाली. ‘हॅपी बर्थ डे ओशा’ असे प्रियाने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. तर एका फोटोसोबत प्रेम, बॉन्डिंग बद्दल एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.  

प्रत्येक वळणावर सोबत देण्यासाठी तिने त्याचे आभारही मानले आहेत. एक फोटात प्रिया व रोशन दोघेही कॅन्डिड पोजमध्ये आहेत. दोघांची केमिस्ट्री बरेच काही सांगणारी आहे. तूर्तास प्रिया व रोशल दोघेही रिलेशनशिपबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे दोघांत काय खिचडी शिजतेय, ते कळायला मार्ग नाही. पण सोशल मीडियावर दोघांच्या प्रेमाला भरते आले आहे, इतके नक्की....


प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्यार्थीनी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या मल्याळम चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत दिसली होती.

Web Title: is priya prakash varrier and oru adaar love co-star roshan abdul rahoof in a relationship