सोन्याचे घड्याळ, चांदीचा चपला घालते आणि दूधाने आंघोळ करते ही अभिनेत्री, जाणून घ्या कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 18:58 IST2021-05-24T18:55:05+5:302021-05-24T18:58:52+5:30

खोटे वाटावे, पण हे सत्य आहे. या अभिनेत्रीची लाईफस्टाईल बघून अन्य अभिनेत्रींनाही हेवा वाटावा.

like princesses actress Digangana Suryavanshiroyal life has chic weights baths with milk wears silver slippers | सोन्याचे घड्याळ, चांदीचा चपला घालते आणि दूधाने आंघोळ करते ही अभिनेत्री, जाणून घ्या कोण?

सोन्याचे घड्याळ, चांदीचा चपला घालते आणि दूधाने आंघोळ करते ही अभिनेत्री, जाणून घ्या कोण?

ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या ती साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच सीटीमार आणि वल्यम या सिनेमात ती दिसणार आहे.

फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांचा थाटच न्यारा. अब्जाधीश असलेले अनेक स्टार्स कोट्यवधींच्या बंगल्यात राहतात, अलिशान गाड्यांमध्ये फिरतात, ऐशोआरामात जगतात. अर्थात अनेकांनी अनेक कष्टानंतर हे ऐश्वर्य मिळवलंय. पण मुळातच गर्भश्रीमंत असणा-यांचीही इथे कमतरता नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गर्भश्रीमंत अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.

ही अभिनेत्री कोण तर बिग बॉस फेम दिगांगना सूर्यवंशी (Digangana Suryavanshi). होय, 2002 साली सोनी टीव्हीच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण करणा-या दिगांगनाचे आज लाखो चाहते आहेत. ही दिगांगना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते. अगदी दूधाने आंघोळ करते, सोन्याचे घड्याळ घालते आणि चांदीची चप्पल घालून मिरवते. (Bigg Boss fame Digangana Suryavanshi)

ऐकून खोटे वाटावे, पण हे सत्य आहे. दिगांगना एका मोठ्या राजेशाही घराण्यातून येते. तिची लाईफस्टाईल बघून अन्य अभिनेत्रींनाही हेवा वाटावा.
वाढदिवसाच्या दिवशी दिगांगनाला दूधाने आंघोळ घालण्यात येते. तिला पारंपरिक आभुषणांनी सजवण्यात येते. पायात चांदीची चप्पल, मनगटावर सोन्याचे घड्याळ, डोक्यावर सोनेरी मुकूट असा तिचा थाट असतो.

दिगांगना 10 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला सोन्याचे घड्याळ भेट दिले होते. वाढदिवसाला हे घड्याळ ती आठवणीने घालते,  तिच्या चांदीच्या चपला कोलकात्याचा एक डिझाईनर डिझाईन करतो.

आईवडिलांनी अनेक नवस बोलल्यानंतर दिगांगनाचा जन्म झाला होता. त्यामुळे तिचा प्रत्येक शब्द फुलासारखा झेलला जातो. 
दिगांगनाला तुम्ही अनेक मालिकांमध्ये बघितले असेल.  टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. बिग बॉसच्या 9 व्या सीझनमध्ये दिगांगना स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. मात्र 57 व्या दिवशी ती या शोमधून बाद झाली होती. ‘जलेबी’ या सिनेमातून तिने डेब्यू केला. यानंतर ‘फ्राय डे ’ या सिनेमातही ती झळकली. मात्र बॉलिवूडमध्ये तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. सध्या ती साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच सीटीमार आणि वल्यम या सिनेमात ती दिसणार आहे.

Web Title: like princesses actress Digangana Suryavanshiroyal life has chic weights baths with milk wears silver slippers