प्रेम चोप्रा यांना मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट; 'या' कारणामुळे करावं लागलं होतं रुग्णलयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 16:49 IST2025-11-16T16:49:06+5:302025-11-16T16:49:56+5:30
काही दिवसांपूर्वी प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रेम चोप्रा यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे.

प्रेम चोप्रा यांना मिळाला डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट; 'या' कारणामुळे करावं लागलं होतं रुग्णलयात दाखल
बॉलिवूडचे दोन दिग्गज गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने चाहत्यांना चिंता सतावत होती. अभिनेते धर्मेंद्र यांच्यानंतर दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयाशी संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता प्रेम चोप्रा यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे.
मीडिया रिपोर्ट आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम चोप्रा यांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र त्यांची प्रकृती कधीही गंभीर नव्हती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना आधीपासूनच हृदयासंबधित त्रास होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णलयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
प्रेम चोप्रा यांचे जावई विकास भल्ला यांनी सांगितलं होतं की, त्यांचे सासरे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. या संदर्भात माहिती देताना विकास भल्ला पुढे म्हणाले होते, "या सर्व वयाशी संबंधित गुंतागुंती आहेत आणि एक नियमित चेकअप आहे. यात काळजी करण्यासारखे काहीही नाही." हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक, प्रेम चोप्रा यांनी त्यांच्या सहा दशकांच्या कारकिर्दीत ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.