अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 04:42 PM2023-10-30T16:42:48+5:302023-10-30T16:46:43+5:30

प्रिती झिंटाचा बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून मोठा सन्मान करण्यात येत आहे. 

Preity Zinta to receive honorary doctorate from Birmingham City University | अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान

अभिनेत्री प्रीती झिंटाला मानद पदवी; बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून बहुमान

प्रिती झिंटाला बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' म्हणूनही ओळखलं जातं. 90 च्या दशकात प्रिती झिंटाने रुपेरी पडद्यावर राज्य केलं आहे. या अभिनेत्रीने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत.  ती सध्या बॉलीवूडमध्ये ॲक्टीव्ह नसली तरी सोशल मीडियामध्ये ती खूप ॲक्टीव्ह आहे. नेहमीच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून ती चाहत्यांच्या कनेक्टमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असते.  तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रिती झिंटाचा बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून मोठा सन्मान करण्यात येत आहे.

प्रीती झिंटाला बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट मिळणार आहे. बॉलीवूड आणि बिझनेस जगतात दिलेल्या योगदानासाठी अभिनेत्रीला हा सन्मान देण्यात येत आहे. यावर प्रीती झिंटा म्हणाली, 'बीसीयूकडून मानद डॉक्टरेट मिळणे हा मोठा बहुमान आहे. बर्मिंगहॅममधील दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे'.


बर्मिंगहॅमचे महापौरांनी प्रीतीचे कौतुक केलं. तर बीसीयूच्या कुलगुरूंनी प्रिती झिंटाचे अभिनंदन केले. 'प्रीती झिंटाचे बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटी कुटुंबात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. चित्रपट निर्मितीच्या विशाल व्यासपीठावर प्रितीचे योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे', असे डेव्हिड एमबीए म्हणाले. 

प्रितीने मुंबईत घर खरेदी केल्याने अभिनेत्री लवकरच मुंबईत शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबईतील वांद्रेच्या पाली हिल परिसरातील इमारतीच्या 11व्या मजल्यावर हे घर आहे. तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाल्यास, प्रिती झिंटाने 2016 मध्ये बिझनेसमन जीन गुडइनफशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्री अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शिफ्ट झाली आहे. 2021 मध्ये प्रीती आणि गुडनफ यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांना जन्म दिला.  
 

Web Title: Preity Zinta to receive honorary doctorate from Birmingham City University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.