प्रेग्नेंट करिना कपूर मलायका आणि अमृतासोबत करतेय एन्जॉय, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 16:34 IST2021-01-09T16:34:32+5:302021-01-09T16:34:59+5:30

काम करण्यासोबत करिना तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबतही एन्जॉय करतेय.

Pregnant kareena kapoor spends quality time with malaika and amrita | प्रेग्नेंट करिना कपूर मलायका आणि अमृतासोबत करतेय एन्जॉय, शेअर केला फोटो

प्रेग्नेंट करिना कपूर मलायका आणि अमृतासोबत करतेय एन्जॉय, शेअर केला फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान प्रेग्नेंट आहे आणि ती तिचा प्रेग्नन्सीचा कााळ मैत्रिणींसोबत एन्जॉय करते आहे. दुसऱ्यांदा आई होणारी करिना स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते आहे. अलीकडेच करिना कपूरनेमलायका अरोरा आणि अमृता अरोरासोबतचा फोटो शेअर केला आहे. काम करण्यासोबत करिना तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबतही एन्जॉय करतेय.

 अलीकडच करिना कपूर खान तिच्या गर्ल गँगला भेटली होती.  करिनाने याचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. फोटोत करिना मलायका, अमृता अरोरा, नताशा पूनावाला आणि मल्लिका भट्टसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतेय. फोटोमध्ये सगळ्याजणी कॅमेऱ्याकडे बघून पोज देताना दिसतायेत. फोटोला कॅप्शन देताना करिनाने लिहिले, 'पुन्हा एकदा' बहीण करिश्मा कपूरला टॅगे करुन 'मिसिंग लोलो' असे देखील लिहिले आहे. 


करिना कपूरची मलायका अरोरा आणि अमृता अरोरासोबत घट्ट मैत्री आहे. नेहमी ती यांच्यासोबत एन्जॉय करताना दिसते. करिना कपूर प्रेग्नंट असल्यापासून तुफान चर्चेत असते. तिची मॅटर्निटी स्टाइलनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.अलीकडे एका मुलाखतीत बेबो तिच्या दुस-या प्रेग्नंसीवर बोलताना दिसली होती. अशी कोणती गोष्ट आहे, जी दुस-या प्रेग्नंसीत तुला करायची नाही, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.यावर मला खूप जास्त वजन वाढवायचे नाही, असे ती म्हणाली होती.

Web Title: Pregnant kareena kapoor spends quality time with malaika and amrita