रुटीन चेकअपसाठी क्लिनिकमध्ये पोहोचली प्रेग्नेंट करिना कपूर, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 16:47 IST2021-02-08T16:47:10+5:302021-02-08T16:47:30+5:30

बाळाच्या जन्माआधी सैफ अली खान आणि करीना कपूर नवीन घरात शिफ्ट झाले आहेत.

Pregnant kareena kapoor heads for routine check up snapped at clinic video viral on social media | रुटीन चेकअपसाठी क्लिनिकमध्ये पोहोचली प्रेग्नेंट करिना कपूर, व्हिडीओ झाला व्हायरल

रुटीन चेकअपसाठी क्लिनिकमध्ये पोहोचली प्रेग्नेंट करिना कपूर, व्हिडीओ झाला व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर दुस्यांदा आई होणार आहे.  आजकाल ती स्वत:ची खास काळजी घेताना दिसेतय.  सोमवारी करिनाला मुंबईतील क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाली. करिना  तिच्या रुटीन चेकअपसाठी  क्लिनिकमध्ये आली होती.  त्याच दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 व्हिडिओमध्ये करिना तिच्या नवीन वांद्रे ऑफिसमधून कारमध्ये बसलेली दिसली आहे.  त्यानंतर ती क्लिनिक बाहेर कारमधून खाली उतरताना दिसली.  या दरम्यान करिनाने ब्लॅक पँट आणि ग्रे रंगाच्या फुल स्लीलव असलेल्या टॉपमध्ये दिसली.  तिने ग्रीन कलरचा मास्क घातला होता. दुस-या प्रसूतीपूर्वी बेबो सर्व तयारी पूर्ण करतेय. हातात असलेल्या सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट तिने पूर्ण केल्या आहेत. बाळाच्या जन्माआधी सैफ अली खान आणि करीना कपूर मुलगा तैमूरसोबत नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. करीनाने त्याची झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. सध्या ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान सैफ अली खानने पॅटर्निटी लिव्ह महत्त्व समजावले. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही माहिती दिली. घरी नवा पाहुणा येणार असता, पत्नीची प्रसूती होणार असताना कोणाला काम करायला आवडेल? आपल्या मुलाला वाढताना बघण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चुकताय. त्यामुळे मी माझ्या बाळासोबत मनसोक्त वेळ घालवणार आहे, असे सैफ म्हणाला.

Web Title: Pregnant kareena kapoor heads for routine check up snapped at clinic video viral on social media