'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 10:14 IST2025-08-14T10:13:12+5:302025-08-14T10:14:06+5:30
प्रतीक गांधीला वाटतेय खंत, सिनेमा चालला नाही कारण...

'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) 'स्कॅम'सीरिजमुळे प्रसिद्धीझोतात आला. आता तो 'सारे जहां से अच्छा' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. दोन महिन्यांपू्र्वी त्याचा 'फुले' सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात तो महात्मा ज्योतिबा फुलेंच्या भूमिकेत दिसला. सुरुवातीला सिनेमावरुन वाद झाल्याने रिलीज डेट पुडे ढकलण्यात आली होती. नंतर सिनेमा रिलीज झाला मात्र तो फारसा चालला नाही. 'स्कॅम'नंतर आलेल्या त्याच्या सिनेमांना कमी जास्त प्रतिसाद मिळाला. यावर आता प्रतीक गांधीने भाष्य केलं आहे.
सिनेमाच्या अपयशावर 'अमर उजाला'शी बोलताना प्रतीक गांधी म्हणाला, "हो, कधी कधी दु:ख नक्कीच होतं. विशेषत: फुले सारख्या सिनेमाकडून खूप अपेक्षा असतात. हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी माझी इच्छा होती. प्रेक्षक सिनेमाचं कौतुक करतील असंही वाटत होतं. मात्र आम्ही जितकी अपेक्षा केली होती तितका सिनेमा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. तरी सुद्धा मी जेव्हा स्किप्ट वाचतो तेव्हाच विचार करतो की हा प्रोजेक्ट माझ्यासाठी योग्य आहे. मग मी त्या भूमिकेसाठी पूर्ण न्याय देतो. म्हणून मला माझंच समाधान वाटतं ना की बाहेरुन मिळणाऱ्या प्रतिसादावर ते अवलंबून असतं."
तो पुढे म्हणाला, "नक्कीच इंडस्ट्रीत अशी एक व्यवस्था हवी जेणेकरुन सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. इंडस्ट्रीत बऱ्याच सुधारणेची गरज आहे. टेक्नॉलॉजी तर आहे पण त्यासाठी प्रेक्षकांपर्यंत जाण्याचा मार्ग शोधावा लागेल. हळूहळू इंडस्ट्री त्या दिशेने जात आहे मात्र तरी आणखी सुधारणेची गरज आहे."
प्रतीक गांधी आगामी सिनेमात महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे. यामुळे तो खूप खूश आहे.