शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:45 PM2023-09-11T12:45:42+5:302023-09-11T12:46:14+5:30

प्रकाश राजने शाहरुख खानच्या 'जवान'वर ट्वीट करत लिहिले,...

Prakash Raj tweets on shahrukh khan film jawan netizens trolled him on social media | शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

शाहरुखच्या 'जवान' वर केलं ट्वीट, प्रकाश राजला पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

googlenewsNext

अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) आजकाल त्याच्या ट्वीट्समुळे सतत चर्चेत असतो. कंगना प्रमाणेच त्याचेही ट्वीट सतत ट्रोल होत असतात. आधी चांद्रयानवरुन केलेल्या ट्वीटमुळे तो चांगलाच ट्रोल झाला. तर आता त्याने शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमावरही ट्वीट केलं आहे. या ट्वीटखालीही नेटकऱ्यांनी त्याला घेरलं आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

प्रकाश राजनेशाहरुख खानच्या 'जवान'वर (Jawan) ट्वीट करत लिहिले, 'गरजेच्या गोष्टींवर आवाज उठवल्याबद्दल धन्यवाद #justasking' झालं तर प्रकाश राजने कोणतंही ट्वीट केलं तरी त्यावर ट्रोलिंग सुरु होतंच. चांद्रयानच्या ट्वीटनंतर तर नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत. या ट्वीटवरही नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत.

'तुझा सिनेमा कधी येतोय सांग यावेळी सगळे सनातनी बॉयकॉट करायला एकजूट होतील', 'नीम का पत्ता कडवा है?', 'शाहरुखच्या जवानचे आभार, प्रकाश सारख्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी. हा सिनेमा त्या लोकांसाठी आहे जे भारत सरकारच्या विरोधात आहेत' अशा कमेंट्स करत प्रकाश राजला नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा लक्ष बनवलं आहे. 

चांद्रयान ३ मोहिमेवेळी प्रकाश राजने एक फोटो ट्वीट केला होता. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ के सिवन यांचा हातात चहाची किटली असलेला तो फोटो होता. 'ब्रेकिंग न्यूज, विक्रम लँडरने चंद्रावरुन घेतलेला पहिला फोटो' असे त्याने लिहिले होते. यावरुनच प्रकाश राजला सर्वांनी धारेवर धरले होते. आता पुन्हा एकदा प्रकाश राज निशाण्यावर आला आहे.

Web Title: Prakash Raj tweets on shahrukh khan film jawan netizens trolled him on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.