प्रकाश राज यांनी स्वत:पेक्षा 12 वर्षे लहान कोरिओग्राफरशी केले लग्न, वाचा लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:27 PM2020-03-26T13:27:05+5:302020-03-26T13:28:29+5:30

अभिनेते प्रकाश राज यांचा आज वाढदिवस...

prakash raj birthday special actor married a choreographer pony verma-ram | प्रकाश राज यांनी स्वत:पेक्षा 12 वर्षे लहान कोरिओग्राफरशी केले लग्न, वाचा लव्हस्टोरी

प्रकाश राज यांनी स्वत:पेक्षा 12 वर्षे लहान कोरिओग्राफरशी केले लग्न, वाचा लव्हस्टोरी

googlenewsNext
ठळक मुद्दे1998 साली ‘हिटलर’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. 

फिल्म इंडस्ट्रीत अनेक स्टार्स आपल्या नावामुळे ओळखले जातात तर अनेक आपल्या भूमिकांमुळे. अशाच अनेक यादगार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते प्रकाश राज यांचा आज वाढदिवस. प्रकाश राज यांनी अनेक भूमिका अमर केल्यात. पण आज आम्ही त्यांच्या भूमिकांबदद्ल नाही तर त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

प्रकाश राज यांनी 1994 साली ललिता कुमारीसोबत लग्न केले होते. मात्र  काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर स्वत:पेक्षा 12 वर्षांनी लहान तरूणीवर प्रकाश राज यांचा जीव जडला. ती कोण तर पोनी वर्मा. होय, पोनी एक कोरिओग्राफर आहे.

पोनी प्रकाश राज यांच्या एका सिनेमात कोरिओग्राफर म्हणून काम करत होती.  प्रकाश राज पहिल्याच नजरेत पोनीच्या प्रेमात पडले. पुढे काळासोबत ही लव्हस्टोरी बहरत गेली आणि प्रकाश राज यांनी पोनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण प्रकाश राज यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली होत्या. त्यांच्या संमतीशिवाय हे लग्न शक्य नव्हते. अखेर प्रकाश राज यांनी या लग्नासाठी मुलींची परवानगी घेण्याचे ठरवले.

प्रकाश यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. ते म्हणाले,‘ पोनीसोबत लग्न करण्याचे मनात होते. पण लग्नाचा निर्णय घेण्याआधी मी माझ्या आई आणि मुलींशी बोललो. मी पुन्हा लग्न करू इच्छितो, हे मी त्यांना थेट सांगितले. पोनीने माझ्या मुलींसोबत वेळ घालवावा, अशी माझी इच्छा होती. त्यानुसार पोनी माझ्या पहिल्या पत्नीला आणि दोन्ही मुलींना भेटली. माझ्या दोन्ही मुलींसोबत तिने वेळ घालवला. काही दिवसांनंतर माझ्या मुलींनी मला पोनीसोबत लग्न करण्याची संमती दिली. यानंतर मी पोनीच्या कुटुंबीयांना भेटलो व आमचे लग्न झाले.’
 


 
प्रकाश राज यांनी आपल्या करिअरमध्ये 2000 वर अधिक साऊथ चित्रपटांत काम केले. 1998 साली ‘हिटलर’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर वॉन्टेड, सिंघम, दबंग, भाग मिल्खा भाग यासारख्या हिंदी सिनेमांमध्ये काम केले.

Web Title: prakash raj birthday special actor married a choreographer pony verma-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.