प्रभूदेवा आपल्या पत्नी आणि चिमुकलीसह घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, सामान्यांप्रमाणे रांगेत उभा दिसला अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:57 IST2023-07-27T13:25:03+5:302023-07-27T14:57:32+5:30

चौथ्यांदा बाबा झालेला प्रभू देवा नुकताच आपल्या चिमुकलीला घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला गेला होता.

Prabhu deva and his second wife himani make first appearance with their daughter visit tirupati | प्रभूदेवा आपल्या पत्नी आणि चिमुकलीसह घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, सामान्यांप्रमाणे रांगेत उभा दिसला अभिनेता

प्रभूदेवा आपल्या पत्नी आणि चिमुकलीसह घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, सामान्यांप्रमाणे रांगेत उभा दिसला अभिनेता

साऊथसह बॉलिवूडलाही आपल्या नृत्यकौशल्याच्या तालावर नाचायला भाग पाडणारा कोरिओग्राफर, अभिनेता म्हणजे प्रभूदेवा (Prabhu deva). आपल्या डान्समुळे अनेकांना वेड लावणारा प्रभू देवा वयाच्या ५० व्या वर्षी बाबा झाला आहे. प्रभू देवाच्या दुसऱ्या पत्नीने जून महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रभूदेवाने स्वत: चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली होती. मुलीच्या आगमनामुळे खूश असलेला प्रभूदेवा चौथ्यांदा बाबा झाला. यापूर्वी त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुलं आहे. मात्र, पहिल्यांदाच घरात मुलीचं आगमन झाल्यामुळे तो कमालीचा खूश झाला होता. आपल्या चिमुकलीला घेऊन प्रभू देवा नुकताच तिरुपतीच्या दर्शनाला गेला होता. पहिल्यांदाच प्रभूदेवा त्याच्या मुलीला घेऊन सर्वाजनिक ठिकाणी दिसला. प्रभू आणि तिची दुसरी पत्नी हिमानी मंदिरात इतर सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभे राहून दर्शन घेतलं. 

यावेळी प्रभू देवाने पांढऱ्या शर्टमध्ये होता. त्याच्या मागे उभी असलेली त्याची पत्नी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सिंपल लूकमध्ये दिसत होती. पत्नीने चिमुकलीला कुशीत घेतले होते. मुलीचा चेहरा दिसत नव्हता. 

दरम्यान, प्रभू देवाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसा कधीच व्यक्त होत नाही. २०२० मध्ये प्रभू देवाने गुपचूप पद्धतीने दुसरं लग्न केलं. परंतु, दुसरी पत्नी हिमानी सिंग हिच्यासोबत तो बालाजीच्या दर्शनाला आला असता त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयीचं सत्य समोर आलं. हिमानी ही डॉक्टर असल्याचं सांगण्यात येतं. प्रभू देवाने १९९५ मध्ये रामलता हिच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या १६ वर्षानंतर त्यांचा संसार मोडला. ते कायदेशीररित्या विभक्त झाले. प्रभू देवा आणि रामलता यांनी तीन मुलं आहेत.
 

Web Title: Prabhu deva and his second wife himani make first appearance with their daughter visit tirupati