‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 11:11 IST2019-08-23T11:10:13+5:302019-08-23T11:11:42+5:30

‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. गत वर्षभरात या चित्रपटासाठी प्रभासने जीवतोड मेहनत घेतली. पण सध्या मात्र प्रभासची झोप उडाली आहे. 

prabhas says he has a sleepless night becuase of saaho | ‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण?

‘साहो’च्या रिलीजपूर्वीच प्रभासची उडाली झोप, काय आहे कारण?

ठळक मुद्देप्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘साहो’ येत्या 30  ऑगस्टला  प्रदर्शित होतोय.

‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर साऊथ सुपरस्टार प्रभासचासाहो’ हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. सध्या प्रभाससाहो’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ‘बाहुबली 2’नंतर प्रभास कधी नव्हे इतका लोकप्रिय झाला. त्याच्याकडे निर्मात्यांच्या अक्षरश: रांगा लागल्या. बॉलिवूडच्याही अनेक  ऑफर्स त्याला मिळाल्या. पण प्रभासने सगळ्या  ऑफर्स नाकारत ‘साहो’ साईन केला. गत वर्षभरात या चित्रपटासाठी प्रभासने जीवतोड मेहनत घेतली. पण सध्या मात्र या सिनेमानेच प्रभासची झोप उडवली आहे. 


होय, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रभासने स्वत: याचा खुलासा केला. ‘साहो’ची रिलीज डेट जशी जशी जवळ येतेय, तसा तसा माझ्यावरचा दबाव वाढतो आहे, असे त्याने सांगितले. तो म्हणाला की, एसएस राजमौलींचा ‘बाहुबली’ हा सिनेमा कधीच विसरता येणार नाही. त्यानंतर मी ‘साहो’ साईन केला. पण या चित्रपटामुळे मी मानसिकदृष्ट्या तणावात आहे. राजमौलींच्या ‘बाहुबली’मुळे माझ्याबद्दलच्या लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. हा भार इतका आहे की, ‘साहो’ करताना मी प्रचंड तणावात होतो. ‘साहो’चे दिग्दर्शक व स्क्रिप्टद्दल माझ्या मनात कुठलाही संशय नाही. पण चाहत्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा दबाव आहेच. हा दबाब इतका आहे की, मी अनेक रात्री मी न झोपता काढल्या. घरातून बाहेर पडतो तेव्हा जणू मी स्वप्नात जगतोय, असे मला वाटते. याआधी मला फार कुणी ओळखत नव्हते. ‘बाहुबली’ने मला नवी ओळख दिली. आज जगाच्या प्रत्येक कानाकोपºयातील लोक मला ओळखतात. 


‘साहो’ पूर्ण करण्यासाठी प्रभासला दोन वर्षे लागलीत. याबद्दल बोलताना त्याने सांगितले की, हा चित्रपट वर्षभरात पूर्ण होईल, अशी आमची अपेक्षा होती. पण अ‍ॅक्शन सीन्समुळे चित्रपट लांबला. गेल्या 5 वर्षांत मी चित्रपट साईन करण्याच्या बाबतीत बराच स्लो झालो आहे. पण आता मला वेगाने काम करायचे आहे.


प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘साहो’ येत्या 30  ऑगस्टला  प्रदर्शित होतोय.

Web Title: prabhas says he has a sleepless night becuase of saaho