प्रभास आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष'च्या शूटिंगला आरंभ, अभिनेत्याने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 15:40 IST2021-02-02T15:33:40+5:302021-02-02T15:40:55+5:30

दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदिपुरुष' या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आहे.

Prabhas saif ali khan starrer film adipurush announces aarambh of the film | प्रभास आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष'च्या शूटिंगला आरंभ, अभिनेत्याने दिली माहिती

प्रभास आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष'च्या शूटिंगला आरंभ, अभिनेत्याने दिली माहिती

दिग्दर्शक ओम राऊतच्या 'आदिपुरुष' या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सैफ अली खान आणि प्रभास यांनी 'सुरुवात' केली आहे. प्रभासने चाहत्यांना या बातमीची माहिती दिली. मंगळवारी त्याने 'आदिपुरुष'चे पोस्टर शेअर करताना 'आरंभ' असे लिहिले आहे.  यासह त्याने सैफ अली खान, ओम राऊत, भूषण कुमार आणि टी सीरिजला टॅग केले आहे.

हा पीरियड ड्रामा सिनेमा 11-08-2022 म्हणजे 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाच्या रिलीजच्या तारखेनंतर चाहत्यांचा 'आदिपुरुष' बद्दलचा उत्साह वाढला आहे. मीडिया रिपोर्टनुसार प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटासाठी अनेक बड्या स्टार्सना साइन केले गेले आहे. सिनेमात प्रभास आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

प्रभास आणि ओम राऊतचा हा सिनेमाचा बजेट खूपच जास्त असल्याची चर्चा आहे. पिंकविला रिपोर्टनुसार 'आदिपुरुष'चा एकूण बजेट 350 ते 400 कोटींचा आहे. पौराणिक कथा रामायण यावर हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये भगवान रामाची भूमिका प्रभास साकारताना दिसणार आहे.


भूमिकेसाठी खास तयारी
बाहुबली सिनेमात प्रभास एक योद्धा म्हणून समोर आला होता. पण ‘आदिपुरूष’मध्ये त्याची भूमिका थोडी वेगळी आहे. या सिनेमात त्याला एक योद्धा कमी आणि धनुर्धर अधिक दिसायचं आहे. यासाठी प्रभासने एक्सपर्टसोबत बोलणी केली आहे. त्याने शरीरावर कामही सुरू केलंय. काही दिवसात प्रभास धनुर्विद्याही शिकणार आहे. ओम राऊत यांच्या तान्हाजी सिनेमात सैफ अली खानने उदयभानची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता पुन्हा लंकेशच्या भूमिकेतून सैफ अली खान ‘आदिपुरुष’मध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे.

Web Title: Prabhas saif ali khan starrer film adipurush announces aarambh of the film