'साहो'तल्या भूमिकेसाठी प्रभासने घेतली 'या' खास गोष्टीवर मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 11:00 IST2019-03-14T10:42:56+5:302019-03-14T11:00:53+5:30

बाहुबलीच्या यशानंतर प्रभास हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. आपल्या आगामी सिनेमातून प्रभास चाहत्यांचे मनोरंजन करायला तयार झाला आहे.

Prabhas loose his weight for saaho role | 'साहो'तल्या भूमिकेसाठी प्रभासने घेतली 'या' खास गोष्टीवर मेहनत

'साहो'तल्या भूमिकेसाठी प्रभासने घेतली 'या' खास गोष्टीवर मेहनत

ठळक मुद्देया सिनेमासाठी प्रभासने खूप मेहनत घेतली आहेसाहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे

बाहुबलीच्या यशानंतर प्रभास हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. आपल्या आगामी सिनेमातून प्रभास चाहत्यांचे मनोरंजन करायला तयार झाला आहे. 'साहो'च्या निर्मात्यांनी नुकत्याच 'शेड्स ऑफ साहो' ची मालिका प्रसिद्ध केली होती. शेड्स ऑफ साहो हा प्रामुख्याने ‘साहो’चा मेकिंग व्हिडिओ आहे. या व्हिडीओत ‘साहो’च्या सगळ्या कलाकारांचा धमाकेदार अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला. 

या सिनेमासाठी प्रभासने खूप मेहनत घेतली आहे. या भूमिकेसाठी त्यांने तब्बल 7 ते 8 किलो वजन कमी केले आहे. प्रभासने  वजन कमी करण्यासाठी खास डाएट तयार केले होते तसेच तो जिममध्ये जाऊन घामदेखील गाळत होता. ‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

 या चित्रपटात श्रद्धा व साऊथ सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रद्धा साऊथ इंडस्ट्रीत डेब्यू करतेय. प्रभास आणि श्रद्धा दोघांचेही चाहते ‘साहो’कडे डोळे लावून बसले आहेत. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. . अबू धाबीतील शूटींगदरम्यान सुमारे ४०० जणांची टीम काम करत होती. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स हॉलिवूड अ‍ॅक्शन डायरेक्टर केनी बेट्स याने डिझाईन केले आहेत.  हा सिनेमा एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषेमध्ये शूट करण्यात आला आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: Prabhas loose his weight for saaho role