'बाहुबली' प्रभासची क्रश होती सलमान खानची 'ही' हिरोईन, सोबत काम करताना केलं हे खास काम...

By अमित इंगोले | Updated: November 3, 2020 11:45 IST2020-11-03T11:42:39+5:302020-11-03T11:45:07+5:30

पहिल्यांदा प्रभाससोबत काम करण्याबाबत भाग्यश्रीने सांगितले की, प्रभास तिचा 'मैने प्यार किया' सिनेमा बघून तिचा फॅन झाला होता.

Prabhas has crush on Bhagyashree working with her in Radhey Shyam | 'बाहुबली' प्रभासची क्रश होती सलमान खानची 'ही' हिरोईन, सोबत काम करताना केलं हे खास काम...

'बाहुबली' प्रभासची क्रश होती सलमान खानची 'ही' हिरोईन, सोबत काम करताना केलं हे खास काम...

प्रभास सध्या त्याच्या आगामी 'राधे श्याम' आणि 'आदिपुरूष' सिनेमांमुळे चर्चेत आहे. यातील 'राधे-श्याम' सिनेमात भाग्यश्री त्याच्या आईची भूमिका साकारत आहे. भाग्यश्री हा रोल करताना जरा असहज होती. पण सिनेमाचे दिग्दर्शक राधा कृष्ण यांनी तिला विश्वास दिला की, ज्याप्रकारे ते तिला प्रझेंट करत आहेत ते प्रेक्षकांना आवडेल. प्रभाससोबत काम करण्याचा अनुभव मजेदार असल्याचं तिने सांगितलं. 

'मैंने प्यार किया' पाहून झाला होता फॅन

पहिल्यांदा प्रभाससोबत काम करण्याबाबत भाग्यश्रीने सांगितले की, प्रभास तिचा 'मैने प्यार किया' सिनेमा बघून तिचा फॅन झाला होता. एका न्यूज चॅनलसोबत बोलताना भाग्यश्रीने सांगितले की, प्रभासने 'मैने प्यार किया' बघितल्याचं सांगितलं होतं. आणि म्हणाला होता की, तो आनंदी आहे त्याला 'राधे श्याम'मध्ये क्रशसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.

कसा होता अनुभव

भाग्यश्रीने सांगितलं की, प्रभास फारच फूडी आहे आणि सेटवर लोकांना मस्त जेवण खाऊ घालतो. त्यांनी सांगितले की, शूटच्या शेवटच्या दिवशी प्रभासने त्यांच्यासाठी फारच चांगल्या डिशेज बनवल्या होत्या. टेबलवर १५ डिश होत्या. ती प्रभासला म्हणाली की, इतकं नाही खाऊ शकत तर सगळं थोडं थोडं ट्राय करू शकता. जेवण घरी तयार केलेलं आहे. त्याने हैद्राबादी मिठाई सुद्धा ऑर्डर केली होती. १५-२० डब्यात वेगवेगळ्या प्रकारची मिठाई होती.

दरम्यान, प्रभास हा 'राधे-श्याम'सोबत 'आदिपुरूष'मध्येही दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात तो रामाची भूमिका साकारणार आहे. तर यात रावणाची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे. तसेच यात सीतेची भूमिका क्रिती सेनन साकारणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर हा त्याचा सर्वात मोठा पौराणिक कथेवर आधारित सिनेमा असणार आहे.
 

Web Title: Prabhas has crush on Bhagyashree working with her in Radhey Shyam