प्रभासच्या आदिपुरुषमध्ये मराठी कलाकारांची फौज, कैकयीच्या भूमिकेत दिसतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:41 IST2023-06-16T17:36:41+5:302023-06-16T17:41:38+5:30

तिने आणि निर्मात्यांनी तिच्या भूमिकेबद्दल कमालिची गुप्तता पाळली होती. विशेष म्हणजे कोणत्याही प्रमोशनच्या कार्यक्रमातही तिला पाहिले गेले नव्हते.

Prabhas Adipurush movie this famous marathi actress played the role of kaikeyi | प्रभासच्या आदिपुरुषमध्ये मराठी कलाकारांची फौज, कैकयीच्या भूमिकेत दिसतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री

प्रभासच्या आदिपुरुषमध्ये मराठी कलाकारांची फौज, कैकयीच्या भूमिकेत दिसतेय ही प्रसिद्ध अभिनेत्री

साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) बाहुबलीच्या यशानंतर पॅन इंडिया स्टार बनला आहे. आता त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत आदिपुरुष (Adipurush) रिलीज झाला. या चित्रपटाची कथा पौराणिक कथेवर आधारीत आहे आणि व्हीएफएक्सवर कोट्यावधी रुपये खर्च केल्यामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभासने रामाची, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंगने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. 

ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात अनेक मराठी कलाकार दिसताहेत. हनुमानाची भूमिका देवदत्त नागेने साकारली आहे तर शूर्पणखेच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित दिसतेय. आणखी एक मराठी अभिनेत्री या सिनेमात आहे. याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. तिने कैकयीची भूमिका यात साकारली आहे.

ही अभिनेत्री आहे सोनाली खरे. सोनाली आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर कैकयीच्या भूमिकेतील एक फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 

ठरला पायरसीचा शिकार 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभास आणि क्रिती सनॉनचा चित्रपट 'आदिपुरुष' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही क्षणातच इंटरनेटवर लीक झाला. प्रेक्षक केवळ चित्रपट पाहू शकत नाहीत तर ते विनामूल्य डाउनलोड देखील करू शकतात. 'आदिपुरुष'  चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर याचा मोठा फटका बसू शकतो.
 

Web Title: Prabhas Adipurush movie this famous marathi actress played the role of kaikeyi