सलमान खानच्या 'ट्यूबलाइट'च्या ट्रेलरची रिलीज डेट पुढे ढकलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 17:58 IST2017-05-23T11:10:05+5:302017-05-23T17:58:58+5:30
सलमान खानचा आगामी चित्रपट ट्यूबलाइट चा ट्रेलर बघण्यासाठी त्याच्या फॅन्सना थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे. याआधी याचित्रपटाचा ट्रेलर ...

सलमान खानच्या 'ट्यूबलाइट'च्या ट्रेलरची रिलीज डेट पुढे ढकलली
स मान खानचा आगामी चित्रपट ट्यूबलाइट चा ट्रेलर बघण्यासाठी त्याच्या फॅन्सना थोडी अजून वाट पाहावी लागणार आहे. याआधी याचित्रपटाचा ट्रेलर 24 मे ला रिलीज होणार होता. मात्र काही वेळा पूर्वीच चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खानने ट्वीटवरुन हा ट्रेलर 25 मे ला रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे. कबीर खानने ट्वीट केले आहे. ट्यूबलाइटचा ट्रेलर 25 मे ला रिलीज करण्यात येणार आहे. ट्रेलर रिलीज करण्यासाठी मी अजून वाट पाहु शकत नाही आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीजर आणि ‘द रेडियो साँग' हे गाणे रिलीज करण्यात आले होते. हे गाणं आणि टीजर प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले.
![]()
ट्यूबलाइटची कथा 1962 साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित आहे. हॉलिवूड चित्रपट 'लिटिल बॉय'चा ऑफिशियल रिमेक आहे. मात्र तरीही दिग्दर्शक कबीर खानने या चित्रपटात बरेच बदल केले आहेत. चायनीज कलाकार जू जू हिचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
कबीर खान आणि सलमान खान या जोडीचा ट्यूबलाइट हा तिसरा चित्रपट आहे. याआधी बजरंगी भाईजान आणि एक था टायगर सारखे हिट चित्रपट या जोडीने बॉलिवूडला दिले आहेत. प्रेक्षकांना या ही वेळेला दोघांकडून एक सुपरहिट चित्रपटाची अपेक्षा आहे. सध्या सलमान खान आबुधाबीमध्ये त्याचा आगामी चित्रपट टायगर जिंदा है चे शूटिंग करतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या ब्रेकअपनंतर त्यांची केमिस्ट्री पहिल्यादांच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.