पॉर्न स्टार मिया मालकोवाच्या बोल्ड सीनला सस्पेन्सचा तडका, राम गोपाल वर्माच्या 'क्लायमॅक्स'चा ट्रेलर OUT!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 17:38 IST2020-05-18T17:37:55+5:302020-05-18T17:38:54+5:30
एरव्ही ज्याच्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सची चर्चा होते त्या राम गोपाल वर्माच्या 'क्लायमॅक्स' चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.

पॉर्न स्टार मिया मालकोवाच्या बोल्ड सीनला सस्पेन्सचा तडका, राम गोपाल वर्माच्या 'क्लायमॅक्स'चा ट्रेलर OUT!
सध्या देशभरात लॉकडाऊन असला तरी राम गोपाल वर्माच्या क्लायमॅक्स सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. एरव्ही ज्याच्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सची चर्चा होते त्या राम गोपाल वर्माच्या क्लायमॅक्स चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. या सिनेमात अमेरिकन अॅडल्ट स्टार मिया मालकोवा काम करत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
रामगोपाल वर्मा दिग्दर्शित क्लायमॅक्सच्या ट्रेलरमध्ये सस्पेंस आणि बोल्डनेसचा भडीमारा पाहायला मिळतो आहे. ट्रेलरमध्ये मिया आपल्या पार्टनरसोबत रेगिस्तान ट्रिपला जाताना दिसते.दोघेही एखाद्या रोमॅंटीक जर्नीवर असल्याचे पाहायला मिळते. ट्रीपदरम्यान काही घटना अशा घडतात ज्याची या दोघांना कल्पना नसते.
क्लायमॅक्सच्या ट्रेलरमध्ये मिया जवळपास टॉपलेस अवतारात दिसते. या आधीही मिया अंगप्रदर्शन करताना दिसली आहे. त्यामुळे या ट्रेलरची सर्वत्र खूप चर्चा होताना दिसते आहे. क्लायमॅक्स चित्रपटाचा हा ट्रेलर साधारण 2 मिनिटांचा आहे.
या आधी मिया आणि रामगोपाल वर्मा,गॉड, सेक्स और ट्रुथमध्ये एकत्र काम करताना दिसले आहेत. त्यानंतर आता हे क्लायमॅक्स चित्रपटात एकत्र आले आहेत.