लेक सोनाक्षीच्या गरोदरपणाच्या चर्चांवर पूनम सिन्हांची प्रतिक्रिया; म्हणाल्या "मला आजी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 18:36 IST2026-04-05T18:34:48+5:302026-04-05T18:36:30+5:30
सोनाक्षी सिन्हाने २३ जून २०२४ रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न केलं होतं.

लेक सोनाक्षीच्या गरोदरपणाच्या चर्चांवर पूनम सिन्हांची प्रतिक्रिया; म्हणाल्या "मला आजी..."
सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. सलमान खानसोबत 'दबंग' सिनेमातून सोनाक्षीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'लुटेरा', 'सन ऑफ सरदार', 'रावडी राठोड' अशा एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमातून सोनाक्षीने काम केलंय. सोनाक्षीने बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न केल्यापासून तिच्या गरोदर असल्याच्या चर्चा जोरदार सुरु होत्या. अनेकदा तिनं या चर्चा फेटाळ्यात. आता खुद्द सोनाक्षीची आई पूनम सिन्हा (Poonam Sinha) यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे गरोदरपणाच्या चर्चांवर भाष्य केले आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना पूनम सिन्हा यांना सोनाक्षीच्या गरोदरपणाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्या हसून म्हणाल्या, "लोकांनी तर मला आतापर्यंत अनेक वेळा आजी बनवलं आहे". त्यांच्या या उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सोशल मीडियावरील अफवांना त्यांनी अत्यंत हलक्या-फुलक्या पद्धतीने फेटाळून लावले.
पूनम सिन्हा पुढे म्हणाल्या की, कुटुंबासाठी अशी कोणतीही आनंदाची बातमी जेव्हा कधी येईल, तेव्हा तो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत खास असेल आणि तो आनंद ते सर्वांसोबत नक्कीच शेअर करतील. दरम्यान, गेल्या वर्षी एका कार्यक्रमातील सोनाक्षीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यातील तिची पोझ पाहून नेटकऱ्यांनी ती 'बेबी बंप' लपवत असल्याचा दावा केला होता. यापूर्वी खुद्द सोनाक्षी आणि झहीरने देखील अशा अफवांना मजेशीर उत्तरे देत फेटाळले.