का व्हायरल होत आहेत पूनम ढिल्लोन यांच्या 21 वर्षांच्या लेकीचे फोटो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 10:51 IST2019-10-04T10:37:15+5:302019-10-04T10:51:00+5:30

होय, आपल्या सौंदर्य आणि अदाकारी या जोरावर भारतीय सिनेप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांची मुलगी पलोमा ठकेरिया ही सध्या जाम चर्चेत आहे.

poonam dhillon daughter paloma dhillon latest pictures going viral | का व्हायरल होत आहेत पूनम ढिल्लोन यांच्या 21 वर्षांच्या लेकीचे फोटो?

का व्हायरल होत आहेत पूनम ढिल्लोन यांच्या 21 वर्षांच्या लेकीचे फोटो?

ठळक मुद्देपलोमाने मुंबईच्या जमनाबाई नर्सी कॉलेजातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सची चर्चा आहे. अनेक स्टारकिड्सनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे तर काही स्टारकिड्स डेब्यूच्या तयारीत आहेत. आज आम्ही अशाच एका स्टारकिडबद्दल सांगणार आहोत. ती म्हणजे, 21 वर्षांची पलोमा. होय, आपल्या सौंदर्य आणि अदाकारी या जोरावर भारतीय सिनेप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूनम ढिल्लोन यांची मुलगी पलोमा ठकेरिया ही सध्या जाम चर्चेत आहे. तिचे फोटो प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. पलोमाने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली नाही. पण तिचे तगडे फॅन फॉलोइंग आहे. लवकरच पलोमा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असेही मानले जात आहे.

पलोमा इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 32.2 हजार फॉलोव्हर्स आहेत. सुंदर फिगर आणि आई पूनमसारखे सौंदर्य यासोबतच पलोमाचा स्टाईल गेमही एकदम हटके आहे.


पलोमाने मुंबईच्या जमनाबाई नर्सी कॉलेजातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आपल्या फिटनेसची काळजी घेण्यासोबतच ती मार्शन आर्ट्सचेही शिक्षण घेतेय.

पलोमाला फिरण्याची प्रचंड आवड आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हॅकेशन पिक्चर्सनी भरलेले आहे. फोटोग्राफीचीही तिला आवड आहे.
पलोमाला फुटबॉल खेळाडू बनायचे होते. पण सध्या ती इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.

पूनम ढिल्लोन यांनी निर्माते अशोक ठकेरीयासोबत लग्न झाले होते. त्या दोघांची ओळख एका होळी पार्टीमध्ये झाली होती. त्या होळीच्या काहीच महिने आधी पूनम यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे होळी साजरी करायची नाही असेच त्यांनी ठरवले होते. पण काही मित्रांच्या आग्रहास्तव त्या एका होळी पार्टीला गेल्या होत्या. तिथे पूनम यांना पाहाताच क्षणी अशोक त्यांच्या प्रेमात पडले. काहीच दिवसांत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्न झाल्यानंतर त्यांनी अभिनयक्षेत्र सोडले. त्यांना पलोमा आणि अनमोल अशी दोन मुले आहेत. पण लग्नाच्या काहीच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेतला. अशोक हे चित्रपटांची निर्मिती करण्यासोबतच अभिनय देखील करतात. त्यांचा मुलगा अनमोल आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Web Title: poonam dhillon daughter paloma dhillon latest pictures going viral