पूजा हेगडेने केली मानधनात वाढ, एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 06:00 IST2021-03-12T06:00:00+5:302021-03-12T06:00:00+5:30

अभिनेत्री पूजा हेगडे सध्या खूप चर्चेत आली आहे. लवकरच ती दाक्षिणात्य स्टार प्रभाससोबत राधेश्याम चित्रपटात झळणार आहे.

Pooja Hegde's honorarium increase, so many crores for a movie | पूजा हेगडेने केली मानधनात वाढ, एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी

पूजा हेगडेने केली मानधनात वाढ, एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी

अभिनेत्री पूजा हेगडे सध्या खूप चर्चेत आली आहे. लवकरच ती दाक्षिणात्य स्टार प्रभाससोबत राधेश्याम चित्रपटात झळणार आहे. हा चित्रपट ३० जुलैला रिलीज होणार आहे. त्याशिवाय दक्षिणेतील स्टार थलपती विजय बरोबर ती एका सिनेमात असणार आहे. अर्थात या दोघांच्या एकत्रित सिनेमाची अद्याप अधिकृतपणे घोषणा केली गेलेली नाही.

या सिनेमाचे शीर्षक देखील अद्याप निश्‍चित झालेले नाही. हा सिनेमा थलपती विजयचा ६५वा सिनेमा असणार आहे. म्हणून सध्या तरी या सिनेमाला 'विजय ६५′ म्हणूनच संबोधले जात आहे. प्रभासबरोबर काम केल्यामुळे तिची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढली आहे. तिने आता आपल्या मानधनामध्ये वाढ केली आहे. आता ती एका सिनेमासाठी २.५ कोटी रुपये मानधन घेणार आहे.


‘राधेश्याम’ एक बहुभाषीक चित्रपट असून राधा कृष्ण कुमार यांच्याद्वारे दिग्दर्शित करण्यात येत आहे. हा चित्रपट गुलशन कुमार आणि टी-सीरीज द्वारे प्रस्तुत आणि यूवी क्रिएशंस द्वारे निर्मित आहे. हा बिग बजेट ड्रामा, रोमँटिक चित्रपट आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे आणि प्रभास यांच्याशिवाय भाग्यश्री, प्रियदर्शी, सचिन खेडेकर, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर इत्यादी मुख्य भूमिकेत आहेत.


प्रभासबरोबरचा 'राधे शाम' हा पूजा हेगडेचा दक्षिणात्य सिनेमातील ८ वर्षांनंतर पुनरागमन करणारा सिनेमा असणार आहे. पूजाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवातच दक्षिणात्य सिनेमांमधून केली होती. हिंदीमध्ये जम बसवण्यापूर्वी दीर्घकाळ ती दक्षिणेतच काम करत होती.


यापूर्वी अल्लू अर्जुन बरोबर 'वैकुंठपुरमलो'मध्ये पूजाने काम केले होते. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर तिच्या वाट्याला 'राधे शाम' आणि 'सर्कस'ची ऑफर आली. आता वाढीव मानधनाच्या आधारे ती दक्षिणेबरोबर हिंदीमध्येही जबरदस्त परफॉर्मन्स देण्याची तयारी करते आहे.

Web Title: Pooja Hegde's honorarium increase, so many crores for a movie