पूजा हेगडे झळकणार प्रभाससोबत, 'राधेश्याम' चित्रपटातील तिचा लूक झाला आऊट
By तेजल गावडे | Updated: October 13, 2020 14:35 IST2020-10-13T14:34:42+5:302020-10-13T14:35:29+5:30
अभिनेत्री पूजा हेगडे 'राधे श्याम'मध्ये प्रभाससोबत रोमांस करताना दिसणार आहे.

पूजा हेगडे झळकणार प्रभाससोबत, 'राधेश्याम' चित्रपटातील तिचा लूक झाला आऊट
‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रभासचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. प्रभासच्या आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अभिनेत्री पूजा हेगडे 'राधे श्याम'मध्ये प्रभाससोबत रोमांस करताना दिसणार आहे. ‘राधेश्याम’, युरोपमध्ये घडणारी ही प्रेमकथा म्हणजे एक महाकाव्य आहे. या चित्रपटात पॅन इंडिया स्टार प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पूजा हेगडेच्या वाढदिवसानिमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचा पहिला लूक सादर केला आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून प्रभासने आपल्या या ‘प्रेरणा’ची ओळख जगासमोर केली आहे. या निमित्ताने शेअर केलेल्या फोटोत ओलिव्ह ग्रीन पोशाखात आणि फ्लोरल ओव्हरकोटमध्ये पूजा तिच्या सुंदर स्मितहास्यासह ट्रामवर बसलेली दिसत आहे. या पोस्टवर पूजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रभासने लिहिले की, "आमच्या ‘प्रेरणा’ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
‘राधेश्याम’ हा त्रैभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत, याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत. हे चित्र यूव्ही क्रिएशन्सद्वारे निर्मित आहे.
पूजा हेगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर पूजाने तमीळ चित्रपट 'मुगमूदी'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
पूजा हेगडेचा तमीळ चित्रपट 'अरविंदा समेथा' चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यात तीन जूनियर एनटीआरसोबत दिसली होती.ती मागील वर्षी रिलीज झालेल्या 'हाऊसफुल ४'मध्ये दिसली होती. यासिनेमात पूजा सह अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सॅनन, कृति खरबंदा यांच्या प्रमुख भूमिक होत्या. साजिद खान दिग्दर्शित 'हाउसफुल-4' ची कथा पुनर्जन्मावर आधारित होती.
राधेश्याम चित्रपटाव्यतिरिक्त पूजा लवकरच सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दीवाली’मध्ये झळकणार आहे.