टीका? मला टीकेची भीती नाही...! पूजा भटने शेअर केला बोल्ड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 12:47 IST2020-07-02T12:47:36+5:302020-07-02T12:47:52+5:30

पूजाने हा फोटो शेअर केला आणि काहीच क्षणात तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

pooja bhatt shares throwback photo in bathtub says i have been in hot water since the early nineties |  टीका? मला टीकेची भीती नाही...! पूजा भटने शेअर केला बोल्ड फोटो

 टीका? मला टीकेची भीती नाही...! पूजा भटने शेअर केला बोल्ड फोटो

ठळक मुद्देमहेश भट्ट यांची थोरली मुलगी असलेल्या पूजाला 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाने अपार प्रसिद्धी मिळवून दिली.

जख्म, सडक, जुनून  यासारखे हिट सिनेमे देणारी अभिनेत्री पूजा भट्ट  अ‍ॅक्टिंगसोबतच तिच्या बोल्डनेसमुळेही चर्चेत राहिली. पूजा सध्या मोठ्या पडद्यावर सक्रीय नाही,पण म्हणून चर्चेतही नाही, असे तुम्ही मानत असाल तर तुम्ही चुकलात असेच म्हणावे लागेल. कारण चर्चेत कसे राहायचे हे पूजाला चांगलेच कळते. तूर्तास पूजाने एक बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती बाथटबमध्ये आंघोळ करताना दिसतेय.

फोटोमध्ये पूजा एका हातात वाइन ग्लास  आहे. फोटोतील तिचा अंदाज बघण्यासारखा आहे. कदाचित म्हणूनच पूजाने हा फोटो शेअर केला आणि काहीच क्षणात तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. पूजाने शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शननेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
 तिच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. तिची आई सोनी राजदान हिनेही या फोटोवर कमेंट केली. ‘लव्ह इट’ असे तिने लिहिले.

पूजा भट लवकरच ‘सडक 2’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आलिया भट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा डिजनीहॉटस्टार रिलीज होणार आहे. या सिनेमात पूजा भट अभिनेत्री तर आहेच पण ती या सिनेमाची निर्माती सुद्धा आहे.

महेश भट्ट यांची थोरली मुलगी असलेल्या पूजाला 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाने अपार प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर  सडक ,  फिर तेरी कहानी याद आयी, चाहत  या चित्रपटात ती दिसली. त्यानंतर मात्र दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात  तिने स्वत:ला झोकून दिले. 

Web Title: pooja bhatt shares throwback photo in bathtub says i have been in hot water since the early nineties