तुम्हाला माहित आहे का आलिया भट व पूजा भटच्या या भावाबद्दल?, बिग बॉस व आमीर खानसोबत आहे हे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 12:35 IST2020-02-03T12:34:29+5:302020-02-03T12:35:12+5:30

महेश भट यांना मुलगा असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे.

Pooja Bhatt Alia Bhatt Brother Rahul Bhatt Has Bigg Boss And Aamir Khan Connection | तुम्हाला माहित आहे का आलिया भट व पूजा भटच्या या भावाबद्दल?, बिग बॉस व आमीर खानसोबत आहे हे कनेक्शन

तुम्हाला माहित आहे का आलिया भट व पूजा भटच्या या भावाबद्दल?, बिग बॉस व आमीर खानसोबत आहे हे कनेक्शन

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्या मुली आलिया भटपूजा भट कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. काही दिवसांपूर्वी सर्वांना आलियाला आणखीन एक बहिण असल्याचे समजले होते. तिचे नाव शाहीन आहे. तसेच आलियाला भाऊ असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. त्याचे नाव राहुल भट असून तो सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाही. परंतु, त्याचे बॉलिवूडशी कनेक्शन आहे. 

नुकताच राहुल भटचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूजा भटने राहुलचे फोटो काही फोटो शेअर केले होते आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोसोबत पूजाने लिहिले की, माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मी एक फॅमिली अल्बम काढला तर त्यामध्ये बघा मला काय मिळाले. 


या फोटोमध्ये पूजा आणि राहुल एकत्र खूप आनंदी दिसत आहेत. दोघेही फोटोमध्ये खूपच क्युट दिसत आहेत.

पूजा भट ही महेश भट यांची पहिली पत्नी किरण भटची मुलगी आहे. तर राहुल भटसुद्धा किरण भटचाच मुलगा आहे.

तर आलिया आणि शाहीन भट या सख्ख्या बहिणी आहेत ज्या महेश भट आणि सोनी राजदान यांच्या मुली आहेत. 


राहुल भट सोशल मीडियावर सक्रीय नाही. राहुल हा फिटनेस ट्रेनर असून त्याने आमीर खानला दंगल चित्रपटासाठी ट्रेनिंग दिली होती.

राहुल बिग बॉस सीजन ४ मध्येसुद्धा पाहायला मिळाला होता. 

 
 

Web Title: Pooja Bhatt Alia Bhatt Brother Rahul Bhatt Has Bigg Boss And Aamir Khan Connection