तर ही होती कंडोमची जाहिरात करणारी पहिली अभिनेत्री, वाचा खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 15:15 IST2020-04-15T15:14:52+5:302020-04-15T15:15:21+5:30

पूजाने 1990 साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले.पूजाला दोन मुले आहेत आलिया आणि ओमर.

Pooja Bedi is first Bollywood actress to do Kamasutra Condom ad-SRJ | तर ही होती कंडोमची जाहिरात करणारी पहिली अभिनेत्री, वाचा खास गोष्टी

तर ही होती कंडोमची जाहिरात करणारी पहिली अभिनेत्री, वाचा खास गोष्टी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. पण यानंतर तिचा एकही सिनेमा चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ सिनेमा केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.पूजा ही अभिनेता कबीर बेदी आणि नृत्यांगणा मॉजेल प्रोतिमा बेदी यांची मुलगी आहे.

 

अभिनयक्षेत्रात फारसे नाव कमवले नसले तरी पूजा नेहमीच लाईमलाईटमध्ये राहते. अनेक बोल्ड सीन, किसींग सीन, कामसुत्रची जाहिरात यामुळे पूजा बेदी प्रसिद्ध आहे. आजही तिच्या बोल्ड अंदाजाने  तेवढीच लोकांच्या लक्षात  असते.  पूजाने 1990 साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले.पूजाला दोन मुले आहेत आलिया आणि ओमर.

मुळात पूजा देखील तिची आई प्रोतिमा यांच्याप्रमाणेच बिनधास्त, बोल्ड  आणि धाडसी आहे. ज्याप्रमाणे चाळीस वर्षापूर्वी प्रोतिमा यांनी जूहु बीचवर न्यूड रन करून सा-यांना आश्चर्यांचा धक्का दिला होता. अगदी त्याचप्रमाणे पूजाने देखील पूजाने केलेली कामसूत्रची जाहिरात खूप विवादात राहिली होती. विशेष म्हणजे कंडोमची जाहिरात करणारी ती पहिली अभिनेत्री होती. अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजाने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते. पूजा बेदी एक्सट्रा मॅरीटल अफेअर आणि सेक्स या विषयावरील तिच्या बोल्ड विधानांमुळे ओळखली जाते.

पती फर्निचरवालापासून पूजाने 2003 साली घटस्फोट घेतला होता. शारीरिक छळाचे कारण तिने सांगितले होते. त्यानंतर अनेकांसह ती अफेअरमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या. 'बिग बॉस सिझन ५'मधील आकाशदीप तसेच गायक अदनान सामीबरोबरही तिचे नाव जोडले गेले होते.  

तसेच पूजा आता मानेक कॉन्ट्रॅक्टरसह नात्यात आहे. आपले आयुष्याचा ती आनंद लुटत आहे. सोशल मीडियावर दोघेही त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत असतात. त्यांच्या दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळते. तसेच पूजाची मुलगी आलया फर्निचरवालानेही बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केले आहे. पहिलाच सिनेमात तिने सैफअली खानसह काम करत सा-यांची पसंती मिळवली होती. 'जवानी जानेमन' सिनेमातील आलयाच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते.

Web Title: Pooja Bedi is first Bollywood actress to do Kamasutra Condom ad-SRJ