पूजा बेदी ५० वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत, लग्नाला आहे मुलांचाही पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 12:02 IST2020-05-15T11:54:12+5:302020-05-15T12:02:13+5:30

पूजाने स्वत:चा खुलासा केला आहे.

Pooja bedi boyfried maneck contractor going to remarry gda | पूजा बेदी ५० वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत, लग्नाला आहे मुलांचाही पाठिंबा

पूजा बेदी ५० वर्षी अडकणार लग्नाच्या बेडीत, लग्नाला आहे मुलांचाही पाठिंबा

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी आपल्या हॉट फोटोंना घेऊन चर्चेत असते. पूजा बेदी सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत आहे. 2019 मध्ये पूजाने व्हॅलेंटाईन डाईनच्या दिवशी साखरपुडा केला. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार पूजा बेदी दुसऱ्यांदा लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.पूजाने स्वत:चा खुलासा केला आहे.

''मॅनेक कॉन्ट्रक्टरसोबत असलेल्या रिलेशनशीपबाबत माझ्या मुलांचा मला सपोर्ट आहे. ऐवढेच नाही तर ते मला दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करतात. मुलं नेहमीच मला म्हणातात की आई तुला कोणाच्यातरी सोबत आयुष्य घालवायला हवं. पुढे ते म्हणतात बाबांना बघ ते लैला आंटीसोबत आयुष्यात स्थिर  झाले आहेत. त्यांना एक मूलदेखील आहे. त्यामुळे तूसुद्धा लग्न करुन आयुष्यात स्थिर हो.'' 

आमिर खानच्या जो जिता वही सिंकदर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पूजा बेदीने  डेब्यू  केला. या चित्रपटानंतर ती लुटेरे, फिर तेरी कहानी याद आयी, शक्ती यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकली.

तिने झलक दिखला जा, नच बलिये, बिग बॉस, फिअर फॅक्टर अशा रिॲलिटी शोमध्ये देखील हजेरी लावली होती. पूजा आजवर पाच वेळा प्रेमात पडली आहे. पूजाने मे 1994 मध्ये फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. साडे तीन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. त्या दोघांना दोन मुलं देखील आहेत. तिची मुलगी आलियाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.

Web Title: Pooja bedi boyfried maneck contractor going to remarry gda