PICS : श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींची गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 10:33 IST2018-02-26T05:03:44+5:302018-02-26T10:33:44+5:30

श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश स्तब्ध आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतही या धक्क्यातून सावरलेली नाही. काल सकाळी श्रीदेवींच्या निधनाची बातमी ...

PICS: After celebrating Sridevi, Bollywood celebrities throng to console Kapoor family! | PICS : श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींची गर्दी!

PICS : श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी बॉलिवूड सेलिब्रेटींची गर्दी!

रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश स्तब्ध आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतही या धक्क्यातून सावरलेली नाही. काल सकाळी श्रीदेवींच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूडसह संपूर्ण देशभर शोक पसरला. तूर्तास कपूर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी मुंबईत अनिल कपूर यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींची रीघ लागली आहे.





श्रीदेवींच्या वर्सोवा येथील बंगल्याबाहेरही चाहत्यांची गर्दी आहे. याठिकाणी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. श्रीदेवींच्या निधनाची बातमी मिळताच, अर्जुन कपूर आपल्या चित्रपटाचे शूटींग अर्धवट सोडून मुंबईत पोहोचला.



करण जोहर व मनीष मल्होत्राही अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले. चार दिवसांपूर्वी या दोघांसोबत श्रीदेवी एन्जॉय करताना दिसल्या होत्या.  श्रीदेवींचे निधन झाले तेव्हा जान्हवी त्यांच्यासोबत नव्हती. शनिवारी श्रीदेवींच्या निधनाची बातमी कळताच करण जोहर सर्वप्रथम जान्हवी जवळ पोहोचला. त्याने लगेच तिला काका अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले. यानंतर कपूर कुटुंबाचे आणि जान्हवीचे सांत्वन करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनिल कपूर यांच्या घरी धाव घेतली. 



अभिनेत्री श्रीदेवी यांनीही अनिल कपूर यांच्या घरी पोहोचत जान्हवीचे सांत्वन केले.





ALSO READ : ...मृत्यूपूर्वीची श्रीदेवी यांच्या आयुष्यातील 'ती' अखेरची 30 मिनिटं

दिग्दर्शक डेव्हिड धवन हेही कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पोहोचले.  अभिनेत्री राणी मुखर्जी आणि वैभवी मर्चंट या दोघीही अनिल कपूर यांच्या घरी पोहोचल्या.
श्रीदेवींचे दुबईत निधन झाले  त्यावेळी पती बोनी कपूर, लहान मुलगी खुशी हे दोघेही दुबईतच होते. पण श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी ही मात्र ‘धडक’ या डेब्यू सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी असल्याने ती मुंबईत होती.





Web Title: PICS: After celebrating Sridevi, Bollywood celebrities throng to console Kapoor family!