PHOTOS: सनी लिओनीचा अमेरिकेत आहे आलिशान बंगला, फोटो पाहून चक्रावतील तुमचे डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 12:54 IST2020-05-27T12:50:07+5:302020-05-27T12:54:16+5:30

सनी लिओनी सध्या राहतेय या आलिशान बंगल्यात, पहा या बंगल्याचे फोटो

PHOTOS: Sunny Leone has a luxurious bungalow in America TJL | PHOTOS: सनी लिओनीचा अमेरिकेत आहे आलिशान बंगला, फोटो पाहून चक्रावतील तुमचे डोळे

PHOTOS: सनी लिओनीचा अमेरिकेत आहे आलिशान बंगला, फोटो पाहून चक्रावतील तुमचे डोळे

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनी तिच्या मादक अदांसोबत लक्झरी लाइफस्टाईलसाठी देखील ओळखली जाते. हे सगळं तिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मिळविले आहे. पॉर्न इंडस्ट्री ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारी सनी लिओनी कोटींची मालकीण आहे. लॉकडाउनदरम्यान ती तिच्या पूर्ण कुटुंबासमवेत लॉस अँजेलिसमधील आलिशान घरात राहत आहे.

सनी लिओनीचा लॉस अँजेलिसमध्ये आलिशान बंगला आहे. हा बंगला एक एकर जमिनीवर वसला आहे. या आलिशान बंगल्याचे फोटो पाहून तुमची शुद्ध हरपून जाईल. आता सनी तिचा नवरा व मुलांसोबत या बंगल्यात राहत आहे. या बंगल्याचे फोटो समोर आले आहेत.

एक एकर जमिनीवर वसलेल्या या आलिशान बंगल्यात 5 बेडरूम आहेत. सनी लिओनीचे घर अमेरिकेतील सर्वात महागड्या ठिकाणी म्हणजे बेवर्ली हिल्सपासून जवळपास 30 मिनिट ड्राइव्हच्या अंतरावर आहे. याशिवाय सनी व डेनिएलचं मुंबईतील जुहू येथे स्वतःचं घर आहे.

सनी लिओनीने हे घर स्वतःला गिफ्ट केले होते. विशेष गोष्ट म्हणजे सनीने या घराचे फोटो शेअर करताना हे सांगितले होते. तिच्या घरातून अप्रतिम नजारा पहायला मिळतो. त्यांचे हे घर खूप सुंदर आहे.

या आलिशान बंगल्याचे फोटो शेअर करत सनीने लिहिले होते की आमचे छोटेसे कंट्री स्टाइल घर, मिडिल सिटीच्या जमिनीवरील एक एकरचं घर.

या घरासाठी सनीने इटली, रोम व स्पेनमधून वस्तू विकत घेतल्या आहेत. तेव्हा हे घर लक्झरी व आलिशान बनले.

कोरोनाच्या संकटामुळे भारतात लॉकडाउन जाहीर झाले त्यावेळी काही दिवस सनी लिओनी मुंबईत होती. त्यानंतर ती अमेरिकेत रवाना झाली.

त्यावेळी तिने सांगितले की, मला व डॅनिएलला संधी मिळाली आणि आम्ही मुलांना लॉस अँजेलिसला घेऊन आलो. आम्हाला वाटते की ते कोरोना पासून इथे जास्त सुरक्षित आहेत.

Web Title: PHOTOS: Sunny Leone has a luxurious bungalow in America TJL