शहजादा तैमूरचा ‘हा’ फोटो तुम्हाला लावेल लळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 19:14 IST2017-06-04T13:23:11+5:302017-06-04T19:14:34+5:30

सध्या सैफ अली खान आणि करिना कपूर-खानचा शहजादा तैमूर अली खान सर्वाधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तुषार कपूरच्या मुलाच्या ...

Photos of Prince of Tiemur | शहजादा तैमूरचा ‘हा’ फोटो तुम्हाला लावेल लळा!

शहजादा तैमूरचा ‘हा’ फोटो तुम्हाला लावेल लळा!

्या सैफ अली खान आणि करिना कपूर-खानचा शहजादा तैमूर अली खान सर्वाधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तुषार कपूरच्या मुलाच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झालेल्या चिमुकल्या तैमूरच्या अदा बघून सगळेच त्याच्या प्रेमात पडले होते. आता असाच काहीसा तैमूरचा एक फोटो समोर आला असून, फोटो बघून तुम्हाला तैमूरचा लळा लागेल, यात शंका नाही. 



रविवारी करिना कपूरच्या फॅन पेजवर तैमऊरचा एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फोटोत तैमूरने दिलेली स्माइल घायाळ करणारी असून, हा फोटो बघतच रहावा अशीच काहीशी अवस्था चाहत्यांची होत आहे. इवल्याशा ओठांना लिपस्टिक लावलेला तैमूर खूपच गोड दिसत आहे. त्याची स्माइल एवढी क्यूट आहे की, कोणालाही त्याचा लळा लागेल. या फोटोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तैमूरची स्माइल मम्मी करिनाप्रमाणेच आहे. 



करिनाचा लहानपणीचा स्माइल करतानाचा फोटो अन् तैमूरचा फोटो समोरासमोर ठेवल्यास दोघांच्याही स्माइलमध्ये साम्य दिसून येईल. वास्तविक आतापर्यंत तैमूरचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुषारच्या लाडक्या लक्ष्यच्या बर्थ डे पार्टीत जेव्हा तैमूर मम्मी करिनासोबत आला होता, तेव्हा त्याचे अनेक फोटोज् कॅमेºयात टिपले होते. मात्र, आता समोर आलेल्या या फोटोत तैमूर खूपच गोंडस दिसत असून, आतापर्यंतचा हा त्याचा सर्वाधिक सुंदर फोटो असल्याचे बोलले जात आहे. 



२० डिसेंबर २०१६ रोजी जन्मलेल्या तैमूरची झलक बघण्यासाठी फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. तैमूर हा पतौडी परिवाराचा वारस आहे. सैफ अली खान याने १६ आॅक्टोबर २०१२ रोजी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या करिनासोबत विवाह केला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. २००८ मध्ये आलेल्या ‘टशन’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध बहरले होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये दोघांची लव्ह स्टोरी चांगलीच बहरली होती. पुढे ते विवाहबद्ध झाले. 

Web Title: Photos of Prince of Tiemur