PHOTO: शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लग्नाला झाली चार वर्ष पूर्ण, अशा प्रकारे सेलिब्रेट केली अॅनेव्हर्सरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 12:15 IST2019-07-08T12:12:07+5:302019-07-08T12:15:30+5:30

मीराने शाहिदबद्दल प्रेम व्यक्त करत 'हॅप्पी 4' अशी कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे शाहिदनेही चाहत्यांना धन्यवाद देत एक छानसा मेसेज लिहीला आहे.

PHOTO: Shahid Kapoor and Mira Rajput married for four years | PHOTO: शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लग्नाला झाली चार वर्ष पूर्ण, अशा प्रकारे सेलिब्रेट केली अॅनेव्हर्सरी !

PHOTO: शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लग्नाला झाली चार वर्ष पूर्ण, अशा प्रकारे सेलिब्रेट केली अॅनेव्हर्सरी !

बॉलिवूडचा कबीर सिंह म्हणजेच शाहिद कपूर आणि मीरा राजपूत. या दोघांच्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. मीरा आणि शाहिद त्यांच्या लग्नानंतर खूप चर्चेत असतात. शाहिद कपूरमीरा राजपूतसोबत जुलै २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकला. त्या दोघांचे फोटो नेहमी सोशल मीडियावर पहायला मिळतात. त्यांच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. लग्नाच्या काही महिन्यानंतरच मीराने मीशाला जन्म दिला. बघता बघता आता हे दोघेही दोन मुलांचे आई- वडिल बनले आहेत. 


मीशा आणि मुलगा झेन अशी या दोन्ही मुलांची नावं आहेत. वेळोवेळी मीरा आणि शाहिद दोघे मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत असतात. दोघेही आता लग्नाला चार वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खूप खुष असून दोघांनी सोशल मीडियावर त्यांचा हा आनंद व्यक्त केला आहे. मीराने शाहिदबद्दल प्रेम व्यक्त करत 'हॅप्पी 4' अशी कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे शाहिदनेही चाहत्यांना धन्यवाद देत एक छानसा मेसेज लिहीला आहे. 

शाहिद व मीरा दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मीरा तर शाहिदसाठी अक्षरश: वेडी आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे शाहिदची प्रशंसा करताना ती जराही थकत नाही. अलीकडे मीराने शाहिदचा एक कोलाज शेअर केला आहे. यात मीराने 16 वर्षांपूर्वीचा शाहिद आणि आत्ताचा शाहिद अशी तुलना केली आहे.

मीराने हा फोटो शेअर करताच, चाहत्यांनी कमेंट करणे सुरु केले. शाहिदचा भाऊ ईशान खट्टर यानेही या फोटोवर ‘खेल खल्लास’ अशी कमेंट दिली. शाहिदच्या एका फिमेल फॅननेही यावर प्रतिक्रिया दिली. ‘16 ईअर चॅलेंज, पूर्वी तो आमचा होता आणि आता नेहमीसाठी तुझा आहे,’ असे तिने लिहिले.एका चाहत्याने शाहिदचा हा फोटो पाहून, शाहिद अजिबात बदलला नाही. तो आधीसारखाच हँडसम दिसतोय, असे लिहिले.

Web Title: PHOTO: Shahid Kapoor and Mira Rajput married for four years