Photo goes viral : ‘बाहुबली’ प्रभासचे आधार कार्ड तुम्ही पाहिले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 14:52 IST2017-06-16T07:50:02+5:302017-06-16T14:52:33+5:30
‘बाहुबली2’ची झिंग अजूनही उतरलेली नाहीय. एस. एस. राजमौली यांचा ‘बाहुबली2’ रोज नव नवे रेकॉर्ड्स बनवत आहे. रिलीजच्या दिवशीच १२१ ...

Photo goes viral : ‘बाहुबली’ प्रभासचे आधार कार्ड तुम्ही पाहिले?
‘ ाहुबली2’ची झिंग अजूनही उतरलेली नाहीय. एस. एस. राजमौली यांचा ‘बाहुबली2’ रोज नव नवे रेकॉर्ड्स बनवत आहे. रिलीजच्या दिवशीच १२१ कोटींचा बिझनेस करणा-या या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाने सगळ्यांनाच अवाक् केले आहे. आज हा चित्रपट रिलीज होऊन ५० दिवस होत आहेत, पण तरिही चित्रपटाची क्रेझ कायम आहे. (रिलीजच्या ५० दिवसांनंतरही देशभरातील १०५० पेक्षा अधिक स्क्रिन्सवर हा चित्रपट दाखवला जात आहे.) चित्रपटासोबत या चित्रपटातील ‘बाहुबली’ प्रभासची क्रेझही कायम आहे. होय, प्रभासशी संबंधित रोज नवी बातमी, रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. प्रभासच्या लव्ह लाईफ बद्दलचे किस्से, त्याला आलेले लव्ह प्रपोजल्स, ‘बाहुबली2’नंतरचा त्याचा पहिला लूक असे काय काय व्हायरल होत आहे. एवढे कमी की काय, म्हणून प्रभासच्या आधार कार्डचे डिटेल्स लीक झाले आहेत.
![]()
ALSO READ : राजमौली यांनी उघड केले, प्रभासचे ‘टॉप सीक्रेट’ !!
होय, प्रभासच्या आधार कार्डची प्रत सध्या वेगाने व्हायरल होत आहे. यावर प्रभासचे पूर्ण नाव लिहिलेले आहे. उप्पलापती व्यंकटा सूर्यनारायना प्रभास, असे त्यावर दिसतेय. सोबत प्रभासचा फोटोही आहे. अर्थात त्याचा आधार कार्ड क्रमांक शाई लावून लपवलेला आहे. तूर्तास प्रभासचे हे आधार कार्ड खरे की खोटे, याचा उलगडा झालेला नाही. प्रभासनेही यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी क्रिकेटपटू महेन्द्र सिंह धोनी याच्या आधारकार्ड डिटेल्स आॅनलाईन लीक झाले होते. धोनीची पत्नी साक्षी हिने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
प्रभास लवकरच ‘साहो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा बजेट तब्बल १५० कोटी रुपयांचा असल्याचे कळतेय. या वर्षा अखेरपर्यंत प्रदर्शित होणारा हा चित्रपट तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. येत्या काळात प्रभास बॉलिवूड डेब्यू करणार अशीही चर्चा सध्या रंगते आहे. करण जोहरसह रोहित शेट्टी प्रभासला घेऊन चित्रपट काढण्यात उत्सूक असल्याची बातमी कालपरवाच आली. अर्थात रोहितने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले आहे.