Phillauri : जेव्हा शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात भुताटकी येते तेव्हा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:19 IST2017-03-21T12:28:46+5:302017-03-21T18:19:29+5:30

​हल्ली बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच त्याने दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याविषयी एक खळबळजनक ट्विट केले होते.

Phillauri: When Shahrukh Khan's 'Mannat' bungalow comes in spirituality ..! | Phillauri : जेव्हा शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात भुताटकी येते तेव्हा..!

Phillauri : जेव्हा शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात भुताटकी येते तेव्हा..!

्ली बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच त्याने दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याविषयी एक खळबळजनक ट्विट केले होते. आता त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये त्याच्या ‘मन्नत’ बंगल्यात भुताटकी घुसल्याचे तो सांगत आहे. 

व्हिडीओच्या सुरुवातीला शाहरूख म्हणतोय की, ‘हाय एव्हरीबडी, हा व्हिडीओ मी याकरिता शूट करीत आहे की, लोक खूपच अंधविश्वासी असतात. खिडकीतून जर कुठला आवाज आला किंवा एखाद्या वाद्याचा आवाज आला की, लगेचच भूत आलं असे म्हणतात; परंतु वास्तवात असे नसते.’ शाहरूखचे हे बोलणे संपताच एका मुलीचा आवाज येतो, ‘सुनीये’ असे म्हणताच शाहरूखची अशी काही त्रेधातिरपीट उडते की, तो थेट त्याच्या रूममधील सोफ्यावर जाऊन बसतो. अन् आपल्या शैलीत म्हणतो को..को...कौन तेवढ्यात ती मुलगी म्हणतेय, मी भूत आहे... फ्रेंडली भूत. शाहरूख म्हणतो, ‘तू घरात कशी आली अन् तू मला दिसत का नाहीस, त्यावर भूत म्हणतंय, मी भूत आहे, घरात कशी पण येऊ शकते अन् मी तुमच्या शेजारीच बसलेली आहे. 

">

भुताटकीचे हे शब्द ऐकून शाहरूखची बोलती बंद होते. तो तिला म्हणतो तुला काय हवे आहे? त्यावर भुताटकी म्हणते मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मला तुम्हाला जवळून बघायचे होते. खरं सांगायचं तर जवळून तुम्ही खूपच सुंदर दिसता. भुताटकीचे हे शब्द ऐकल्यानंतर शाहरूख जरा खुलून जातो. तो तिला म्हणतो तू खूपच फ्लर्ट करणारी आहेस. मला तुला काही कॉम्प्लिमेंट्स द्यायच्या आहेत. काय, मी तुला बघू शकतो? त्यावर भुताटकी म्हणते हो बघू शकता ना. मी येत्या २४ मार्च रोजी थिएटरमध्ये येणार आहे. तुम्ही मला ‘फिलौरी’मध्ये बघू शकाल. शाहरूख हे ऐकू न चक्क उत्साहाच्या भरात भुताटकीला किस करतो.    



वास्तविक शाहरूखचा हा व्हिडीओ म्हणजे अनुष्का शर्मा हिच्या आगामी ‘फिलौरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग होता. या चित्रपटात अनुष्का शशी नावाच्या भुताटकीची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळे फंडे वापरण्यात आले आहेत. करनेश शर्मा यांनी प्रोड्यूस केलेला हा चित्रपट येत्या २४ मार्च रोजी रिलिज होणार आहे. 

Web Title: Phillauri: When Shahrukh Khan's 'Mannat' bungalow comes in spirituality ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.