प्रियांका व निकवर ‘पेटा’ नाराज! लग्नात प्राण्यांचा छळ केल्याचा आरोप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 12:48 IST2018-12-04T12:47:36+5:302018-12-04T12:48:28+5:30

य, पेटाने निकयांकावर लग्नात हत्ती-घोड्यांच्या वापरावर आक्षेप घेतला आहे.

peta accused priyanka chopra and nick jonas of animal cruelty for using horse-elephant-during-wedding- | प्रियांका व निकवर ‘पेटा’ नाराज! लग्नात प्राण्यांचा छळ केल्याचा आरोप!!

प्रियांका व निकवर ‘पेटा’ नाराज! लग्नात प्राण्यांचा छळ केल्याचा आरोप!!

ठळक मुद्देप्रियांका व निक या दोघांनी पेटाच्या आक्षेपावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण ते काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचे शाही लग्न पार पडले. पण या लग्नासोबत प्रियांका व निकने काही वादही ओढवून घेतलेत.  सर्वात आधी लग्नात आतीषबाजी केल्यावरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली. याचे कारण म्हणजे, प्रियांकाने स्वत: दिवाळीत फटाके न उडवण्याचे आवाहन लोकांना केले होते. पण खुद्द प्रियांकाच्या लग्नात मात्र फटाक्यांची आतीषबाजी केली. यावरून लोकांनी प्रियांकाला बरेच काही सुनावले होते. इतके कमी की काय म्हणून  आता प्रियांका व निकचे लग्न पेटा (PETA- People for the Ethical Treatment of Animals) या प्राणीसुरक्षा संस्थेच्या निशाण्यावर आले आहे. होय, पेटाने निकयांकाच्या लग्नात हत्ती-घोड्यांच्या वापरावर आक्षेप घेतला आहे. प्रियांका निकच्या लग्नात हत्ती आणि घोड्यांचा वापर झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर पेटाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत या घटनेवर आक्षेप नोंदवला आहे.



‘डियर प्रियांका चोप्रा अ‍ॅण्ड निक जोनास, आजकाल लोक लग्नात हत्ती-घोड्यांचा वापर करणे टाळतात. लग्नाच्या शुभेच्छा. पण आम्हाला दु:ख आहे की, प्राण्यांसाठी हा आनंदाचा दिवस नव्हता,’ असे पेटाने लिहिले आहे. पेटाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लग्नात प्राण्यांवर कशाप्रकारे अत्याचार होतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कशाप्रकारची साधने वापरली जातात हे दाखविले आहे.  
मीडियाचे मानात तर हिंदू वेडिंगमध्ये निक जोनास घोडीवर बसून आला होता. प्रियांका व निक या दोघांनी पेटाच्या आक्षेपावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पण ते काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

Web Title: peta accused priyanka chopra and nick jonas of animal cruelty for using horse-elephant-during-wedding-