कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 19:00 IST2018-10-22T18:58:02+5:302018-10-22T19:00:48+5:30
PEtरणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहिर झाली आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. बॉलिवूडमधून या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!!
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहिर झाली आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. बॉलिवूडमधून या कपलवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी दीपवीरला शुभेच्छा दिल्यात. अगदी करण जोहरपासून करिश्मा कपूर, प्रियांका चोप्रा ते जरीन खानपासून तर ईशा गुप्तापर्यंत सगळ्यांनी ‘दीपवीर’ला वेगवेगळ्या ढंगात शुभेच्छा दिल्यात. चाहत्यांनीही दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला.या शुभेच्छा संदेशामध्ये एक गोष्ट लक्षवेधी ठरली, ती म्हणजे अनेकांनी रणवीर व दीपिकाला शुभेच्छा देतांना त्यांना वेगवेगळी, गोड नावेही दिलीत.
होय, प्रियांका चोप्राने रणवीर खास शुभेच्छा दिल्यात. आपल्या शुभेच्छा संदेशात तिने रणवीरला ‘रन्नो’ म्हणून संबोधले. ‘तू तो हिरो बन गाया रन्नो,’ असे तिने लिहिले.
प्रियांका चोप्राची चुलत बहिण अभिनेत्री परिणीती चोप्रानेही रणवीरला गोड शुभेच्छा दिल्यात. होय, आपल्या शुभेच्छा संदेशात तिने रणवीरला ‘न्युटेला बबलू’ संबोधले़ आरव्ही मेरा न्युटेला बबलू, असे तिने लिहिले.
आलिया भट्टने रणवीरला ‘टूटू’ म्हटले आहे. आलिया रणवीरला प्रेमाने टूटू म्हणते आणि रणवीर आलियाला लूलू म्हणतो. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांना याच नावाने बोलवतात.
एका चाहत्याने दीपिका-रणवीरला शुभेच्छा देताना ‘अभिनंदन, सिम्बा आणि नाला’ ( सिम्बा आणि नाला हे डिज्नीच्या द लायन किंगमधील कार्टून कॅरेक्टर आहेत़ याशिवाय रणवीरचा ‘सिम्बा’ नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय) असा ‘दीपवीर’चा उल्लेख केला़