पीसी ‘न्यूयॉर्क सिटी’च्या प्रेमात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 15:04 IST2016-10-20T15:04:39+5:302016-10-20T15:04:39+5:30
भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या न्यूयॉर्क सिटीत ‘क्वांटिको सीझन २’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण ही शूटींग करता ...

पीसी ‘न्यूयॉर्क सिटी’च्या प्रेमात!
भ रतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या न्यूयॉर्क सिटीत ‘क्वांटिको सीझन २’ च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. पण ही शूटींग करता करता प्रियांका न्यूयॉर्कच्या अक्षरश: प्रेमातच पडलीयं. न्यूयॉर्कचे कौतुक करताना ती जराही थकत नाहीये. ‘न्यूयॉर्क म्हणजे उत्साह, न्यूयॉर्क म्हणजे चैतन्य, आणि बरंच काही...’असं काय, काय ती सांगत सुटलीयं.
आपल्या ‘देसी गर्ल’ला झालंय तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण प्रियांकाला या शहरात शूटींग करायला मनापासून आवडते, हे त्यामागचं गोड गुपित आहे. न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको’चे शूटिंग करण्यास परवानगी दिल्याने पीसीने महापौरांचेही आभार मानले आहेत.
![priyanka chopra]()
न्यूयॉर्कमध्ये ‘क्वांटिको’च्या शूटींगला परवानगी मिळाल्याने माझे काम सोपे झाले आहे. न्यूयॉर्क सिटी जगाच्या केंद्रस्थानी असल्याने मला फ्लाईटने भारतात लवकर पोहोचता येतं. या शहरात प्रत्येक गोष्टीत प्रचंड ऊर्जा आहे. निसर्गरम्य वातावरणात माझं छोटंसं घर देखील आहे, असे पीसी म्हणाली. वेल, पीसी कितीही तुला न्यूयॉर्क आवडलं तरीही भारताची बात काही औरच आहे, नाही का?
cnxoldfiles/span> सीझनमध्ये सीआयए एजेंटच्या भूमिकेत दिसतेय. ‘क्वांटिको’मध्ये ती एफबीआय एजेंट अॅलेक्स पॅरिशच्या भूमिकेत होती.