दिशा पटानी म्हणते, कोणासोबत नाव येणे, हा कामाचाच भाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 18:42 IST2017-03-10T13:12:18+5:302017-03-10T18:42:18+5:30

अभिनेत्री दिशा पटानी हिच्या अनुसार सेलिब्रिटींसोबत काही अडचणी येतातच. माझे कोणासोबत नाव येणे हा देखील कामाचाच भाग आहे. टायगर ...

Patani says, with whom to get a name, part of this work! | दिशा पटानी म्हणते, कोणासोबत नाव येणे, हा कामाचाच भाग!

दिशा पटानी म्हणते, कोणासोबत नाव येणे, हा कामाचाच भाग!

िनेत्री दिशा पटानी हिच्या अनुसार सेलिब्रिटींसोबत काही अडचणी येतातच. माझे कोणासोबत नाव येणे हा देखील कामाचाच भाग आहे.
टायगर श्रॉफसोबत तिचे नाव सातत्याने येते आहे. अनेक वेळा ती अशा बातम्यांमुळे चर्चेत असते आणि ट्रोल केले जात आहे. दिशाला अशा पद्धतीने कायम चर्चेत राहणे पसंत नाही, मात्र कोणत्याही सेलिब्रिटीच्या कामाचाच हा भाग आहे. ‘कोणालाही अशा पद्धतीने बातम्यांमध्ये राहणे पसंत नाही. हा माझ्या कामाचा भाग आहे. हे करिअर मी निवडले आहे. मला हे जर आवडत नसेल तर मी दुसरा व्यवसाय निवडू शकले असते. त्यामुळे मी बाहेर जाऊन मला हे आवडत नाही, असं सांगणे चुकीचे आहे.’ असे तिला वाटते.
काही दिवसांपूर्वी ‘स्टुडंटस् आॅफ दि इअर’च्या सिक्वेलमधून दिशा पटानी बाहेर पडली असून, तिच्या जागी सैफ अली खान-अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिला संधी देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. आपला बॉयफ्रेंड टायगर श्रॉफच्या चित्रपटात संधी न मिळण्याची ही तिची दुसरी वेळ आहे. बागी या चित्रपटात दिशाच्या ऐवजी श्रद्धा कपूरला घेण्यात आले होते. 
दिशा म्हणते, ‘मी अत्यंत साधी आणि लाजाळू मुलगी आहे. जर तुम्ही पडद्यावर अथवा सार्वजनिक मंचावर असाल तर लोक तुमच्या आयुष्याबाबत जाणू इच्छितात. माझ्या कामावर लक्ष दिले जात असेल तर मला काही अडचण नाही. 




Web Title: Patani says, with whom to get a name, part of this work!