Parineeti-Raghav Mehndi: परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 11:26 IST2023-09-20T11:26:13+5:302023-09-20T11:26:40+5:30

Parineeti-Raghav Mehndi: परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा २४ सप्टेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या रिती रिवाजांना सुरुवात झाली आहे.

Parineeti-Raghav Mehndi: Mehndi with Raghav Chadha's name painted on Parineeti Chopra's hand, photo surfaced | Parineeti-Raghav Mehndi: परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, फोटो आला समोर

Parineeti-Raghav Mehndi: परिणीती चोप्राच्या हातावर रंगली राघव चड्ढा यांच्या नावाची मेहंदी, फोटो आला समोर

परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चढ्ढा (Raghav Chaddha) यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दिल्लीत लग्नाचे फंक्शन्स सुरू झाले आहेत. १९ सप्टेंबरला परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा गुरुद्वाराचा फोटो आहे ज्यात परिणिती तिच्या हातावर मेहंदी पाहायला मिळत आहे.

राघव आणि परिणीती यांचा मेहंदी फंक्शन दिल्लीत पार पडले. राघव यांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे फंक्शनचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले नाहीत. या फंक्शनचा फोटो परिणीतीच्या फॅन पेजने शेअर केला आहे. फोटोमध्ये राघव आणि परिणीती दोघेही पेस्टल पिंक कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. परिणीतीच्या हातावर मेंदी लावली आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हे लग्न उदयपूरमध्ये होणार आहे
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे लग्न उदयपूरमध्ये होणार आहे. २३ सप्टेंबरपासून लग्नाचे सोहळे सुरू होणार आहेत. परिणीती चोप्राचा चुडा सोहळा २३ तारखेला होणार आहे. त्यानंतर २४ सप्टेंबरला लग्न आणि रिसेप्शन होणार आहे. परिणीती-राघवचा विवाह २४ सप्टेंबर रोजी दुपारी होणार आहे. त्यानंतर सायंकाळी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये कुटुंब आणि काही खास मित्रांचा समावेश असेल.

चंदिगडमध्ये रिसेप्शन 
उदयपूरनंतर दुसरे रिसेप्शन चंदीगडमध्ये होणार आहे. चंदिगडमधील ताज हॉटेलमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. परिणीती तिच्या बॉलिवूड मित्रांसाठी रिसेप्शन देखील ठेवू शकते, ते कुठे होईल हे याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

१३ मे रोजी झाली रिंग सेरेमनी
परिणीती आणि राघवची रिंग सेरेमनी यावर्षी मे महिन्यात झाली होती. हा कार्यक्रम दिल्लीत झाला. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र सहभागी झाले होते.

Web Title: Parineeti-Raghav Mehndi: Mehndi with Raghav Chadha's name painted on Parineeti Chopra's hand, photo surfaced