परिणीतीच्या भावाची लाडक्या मेव्हण्यासाठी खास पोस्ट, म्हणाला 'चोप्रा कुटुंबातील क्रेझीनेसमध्ये...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 17:58 IST2023-09-25T17:54:25+5:302023-09-25T17:58:07+5:30
परिणीतीचा भाऊ शिवांगने लाडकी बहिण आणि आपल्या मेव्हण्यासाठी खास पोस्ट केली आहे.

Parineeti Chopra's brother shivang chopra welcomes 'jiju' Raghav to the family with sweet post
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा यांचा विवाह सोहळा पार पडला. रविवारी (२४ सप्टेंबर) उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये ते लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांनी सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली. सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी परिणीती आणि राघव यांना त्यांच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता परिणीतीचा भाऊ शिवांगने लाडकी बहिण आणि आपल्या मेव्हण्यासाठी खास पोस्ट केली आहे. त्याने मेव्हणा राघवचे चोप्रा कुटुंबात स्वागत केले आहे.
शिवांग चोप्राने इन्स्टाग्राम अकाउंटवर परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले. फोटोंसह शिवांगने एक हृदयस्पर्शी नोट शेअर केली. यात त्याने म्हटलं की, "काही गोष्टी, लोक अगदी योग्य वाटतात. काही क्षण आणि त्या भावना फार सुंदर असतात. चोप्रा आणि चड्डा यांच्यासाठी हे सर्व खुप छान होते. राघव चढ्ढा तुमचं चोप्रा कुटुंबाच्या क्रेझीनेसमध्ये स्वागत आहे. देखण्या तरुणाच्या शेजारी परिणीती खूपच सुंदर दिसतेय. तुम्हा दोघांना खूप प्रेम".
परिणीती व राघव यांचा लग्नानंतर पती-पत्नी म्हणून पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये परिणीतीने फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली आहे आणि हातात त्याच रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत. आज ते दोघेही उदयपूरहून निघणार आहेत. दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी परिणीती आणि राघव चड्ढा यांचं वेडिंग रिसेप्शन असणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडसेलिब्रिटींबरोबर राजकीय मंडळीही उपस्थित असणार आहेत. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर परिणीती – राघव विवाहबंधनात अडकले आहेत.