परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या फोटोंवर बहीण प्रियंका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव, म्हणाली- माझे आर्शीवाद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 12:59 IST2023-09-25T12:52:10+5:302023-09-25T12:59:39+5:30

अनेक सेलिब्रिटींनीही परिणीती आणि राघव चड्ढा यांचं अभिनंदन केलं आहे.

Parineeti chopra raghav wedding pics priyanka chopra showers her blessings | परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या फोटोंवर बहीण प्रियंका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव, म्हणाली- माझे आर्शीवाद...

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या फोटोंवर बहीण प्रियंका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव, म्हणाली- माझे आर्शीवाद...

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आप खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. उदयपूरमधील लीला पॅलेस येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता राघव आणि परिणीती यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. लग्नानंतर परिणीतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.

परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी अत्यंत साधा लूक केला होता. परिणीतीने लग्नासाठी खास क्रिम रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची मॅचिंग ज्वेलरीमुळे नववधू परिणीतीचं सौंदर्य खुललं होतं. तर राघव चड्ढा यांनी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. डोक्यावर फेटा बांधल्यामुळे राघव चड्ढा अगदी राजबिंडासारखे दिसत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

परिणीतीने लग्नाचे फोटो शेअर करत "नाश्ताच्या टेबलवरील पहिल्या संभाषणापासूनच आपल्याला माहीत होतं. या दिवसाची मी खूप काळापासून वाट पाहत होते. आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहेत. एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही," असं म्हटलं आहे.

परिणीतीच्या या पोस्टवर कमेंट चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही परिणीती आणि राघव चड्ढा यांचं अभिनंदन केलं आहे. परिणीतीची बहिण प्रियंका चोप्राने दिली दोघांच्या फोटोवर कमेंट केली आहे. प्रियंकाने कमेंट करत लिहिले, ''माझे आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत आहे.'' यासोबतच प्रियंकाने हार्ट, फायर आणि रडणारा इमोजी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केला.  

प्रियंका चोप्रा परिणीती आणि राघवच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही. मात्र, मे महिन्यात झालेल्या या कपलच्या एंगेजमेंट फंक्शनला अभिनेत्री हजेरी लावली होती. प्रियंकाची आई मधू चोप्रा परिणीती आणि राघवच्या प्री-वेडिंग फंक्शनपासून लग्नापर्यंतच्या प्रत्येक सोहळ्याला उपस्थित होत्या. 

Web Title: Parineeti chopra raghav wedding pics priyanka chopra showers her blessings