परिणीती चोप्रानं फ्लॉन्ट केला बेबी बंप, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:32 IST2025-09-26T17:31:19+5:302025-09-26T17:32:00+5:30
मॉम टू बी परिणीतीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे.

परिणीती चोप्रानं फ्लॉन्ट केला बेबी बंप, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गरोदर आहे. काही दिवसांपूर्वीच परिणीतीने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. परिणीती चोप्रा गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच तिच्या बेबी बंपसह (Baby Bump) पाहायला मिळाली आहे. तब्बल आठ महिन्यांच्या ब्रेकनंतर परिणीतीने तिचे यूट्यूब चॅनल पुन्हा लाँच केलं आहे.
मॉम टू बी परिणीतीनं युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती युट्यूबवर कुठलं कटेंट शेअर करायचं यावर बोलताना दिसली. परिणीतीनं गेल्यावर्षी युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. पण, त्यावर एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर ती गायब झाली होती. आता तिनं युट्यूबवर सक्रिय राहण्याचं आश्वासन तिच्या चाहत्यांना दिलं आहे. या व्हिडीओमध्ये परिणीतीनं अगदी सैल कपडे परिधान केले आहेत. मात्र, तरीही त्यातून तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत आहे. ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती. आता लग्नानंतर दोन वर्षांनी आईबाबा होणार असल्याने ते दोघेही आनंदी आहेत. राघव चड्ढा हे राजकारणात सक्रीय असून आम आदमी पक्षाचे ते खासदार आहेत. परिणीती आणि राघव हे कायम चाहत्यांना कपलगोल्स देतात. दोघेही एकमेंकावरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अलिकडेच तिचा इम्तियाज अली दिग्दर्शित 'अमर सिंग चमकीला' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.