कोरोनाची लस घेतल्यानंतर काहीच दिवसांत परेश रावल यांना झाला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 12:00 IST2021-03-27T11:57:53+5:302021-03-27T12:00:11+5:30

परेश रावल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. 

Paresh Rawal Tests COVID-19 Positive Weeks After First Vaccine | कोरोनाची लस घेतल्यानंतर काहीच दिवसांत परेश रावल यांना झाला कोरोना

कोरोनाची लस घेतल्यानंतर काहीच दिवसांत परेश रावल यांना झाला कोरोना

ठळक मुद्देपरेश रावल यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी त्यांची टेस्ट करून घ्यावी...

कोरोनाचे रुग्ण भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी सतत मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे असे सरकार सांगत आहे. पण असे असले तरी लोक कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीयेत. सरकार सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करत आहे. 

सध्या साठ वर्षांवरील लोकांना आणि काही आजार असलेल्या 45 वर्षावरील लोकांना सध्या लस दिली जात आहे. अभिनेता परेश रावलने नुकतीच कोरोनाची लस घेतली होती. आता लस घेतल्यानंतर देखील त्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. परेश रावल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. 

परेश रावल यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून गेल्या 10 दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी त्यांची टेस्ट करून घ्यावी...

परेश रावल यांनी 9 मार्चला कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांचा फोटो ट्विटरला शेअर केला होता आणि डॉक्टर, परिचारिका, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले होते. 

Web Title: Paresh Rawal Tests COVID-19 Positive Weeks After First Vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.