परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 12:08 IST2025-10-25T12:07:33+5:302025-10-25T12:08:04+5:30
आधी 'हेरा फेरी ३'वरुन झालेला वाद, आता परेश रावल यांनी नाकारला 'दृश्यम ३'

परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."
अभिनेते परेश रावल मध्यंतरी चर्चेत होते. 'हेरा फेरी ३' सिनेमा सोडल्याची त्यांनी घोषणा केली होती. क्रिएटिव्ह मतभेदांमुळे त्यांनी सिनेमा सोडला होता. नंतर वाद मिटला आणि त्यांची पुन्हा सिनेमात एन्ट्री झाली. आता परेश रावल यांनी अजय देवगणचा 'दृश्यम ३' ही नाकारल्याची चर्चा आहे. स्क्रिप्ट आवडली नसल्याने त्यांनी सिनेमाला नकार दिला आहे.
'दृश्यम ३' ओरिजनल मल्याळम सिनेमाचं शूट सुरु झालं आहे. दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्याकडून हिंदी व्हर्जनच्या शूटसाठी परवानगी यायची आहे. तसंच सिनेमाच्या कास्टिंगवरही चर्चा सुरु आहे. परेश रावल यांना सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेची ऑफर होती. मात्र त्यांनी सिनेमाला नकार दिला अशी चर्चा झाली. आता बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल म्हणाले, "मी दृश्यम ३ साईन केलेली नाही. माध्यमांमध्ये जे रिपोर्ट्स येत आहेत त्यात काहीच तथ्य नाही. हो, मला मेकर्सने एका भूमिकेसाठी ऑफर दिली होती. पण मला वाटलं की मी या भूमिकेसाठी योग्य नाही. मला मजा आली नाही. पण खरं सांगू स्क्रिप्ट खूप छान आहे. मी खूप प्रभावित झालो. पण स्क्रिप्ट कितीही चांगली असली तरी जोवर तुमची भूमिका त्यात चांगली नसेल तर फायदा नाही."
'दृश्यम ३'च्या मल्याळम वर्जनमध्ये अभिनेते मोहनलाल आहेत. पुढील वर्षीच हा सिनेमा रिलीज होणार आहे. यानंतर हिंदी सिनेमा रिलीज होईल. दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनी हिंदी मेकर्सला इशाराच दिला आहे की मल्याळम व्हर्जन आधी हिंदी रिलीज केला तर कडक कारवाई केली जाईल.