'हेरा फेरी ३' सोडलेल्या परेश रावल यांना 'या' खास व्यक्तीने मनवलं, कोण आहे तो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 08:55 IST2025-07-01T08:52:36+5:302025-07-01T08:55:10+5:30
'हेरा फेरी ३' परेश रावल यांचं कमबॅक होण्यामध्ये कोणाचा हात आहे. या खास व्यक्तींची नावं आली समोर

'हेरा फेरी ३' सोडलेल्या परेश रावल यांना 'या' खास व्यक्तीने मनवलं, कोण आहे तो?
'हेरा फेरी ३' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्याने मोठा वाद निर्माण झाला. बाबू भैय्या 'हेरा फेरी ३'मध्ये दिसणार नाही, अशी बातमी आल्याने 'हेरा फेरी' सिनेमाच्या चाहत्यांना चांगलंच दुःख झालं. पण काल परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केल्याचं जाहीर केल्याने सर्वांना चांगलाच आनंद झाला. आता सर्व वाद मिटून परेश, अक्षय, सुनील ही जोडी 'हेरा फेरी ३'मध्ये पुन्हा दिसणार असल्याने सर्वांना सिनेमाची उत्सुकता आहे. परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅकमागे एका खास व्यक्तीचा हात आहे.
या व्यक्तीमुळे परेश रावल यांचं कमबॅक
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, निर्माते साजिद नाडियादवाला आणि अहमद खान यांनी 'हेरा फेरी ३'चा वाद सोडवण्यामागे मोठी जबाबदारी निभावली. याविषयी सिनेमाचा निर्माता फिरोज नाडियादवालाने सविस्तर माहिती सांगितली. ते म्हणाले की, साजिद आणि अहमद या दोघांनी वैयक्तिक स्तरावर परेश रावल यांना सिनेमात परत आणण्यासाठी प्रयत्न केले. या सर्व प्रक्रियेत अक्षय कुमारने सुद्धा महत्वाची भूमिका निभावली. परेश रावल यांच्यासोबत असणारे जुने संबंध आणि मैत्रीपूर्ण नातं या गोष्टी विचारात घेऊन अक्षयने अत्यंत शांतपणे हा गुंता सोडवला. ज्या पद्धतीने आधीचे दोन भाग बनले होते, त्याच सकारात्मक दृष्टीकोनातून तीसरा भाग बनेल, अशी अक्षयला आशा आहे.
#pareshrawal back in #HeraPheri3
— Boundary Breaker (@CricToPolitics) June 29, 2025
What a News 😍❤️
Who's excited for the movie og Star Cast is Back pic.twitter.com/bL20M4r4QD
परेश रावल काय म्हणाले
'हेरा फेरी ३'चा वाद मिटल्यानंतर परेश रावल म्हणाले,"हेरा फेरी सारखा सिनेमा एकदाच बनतो. सतत ही जादू घडत नाही. नाहीतर त्यात तोचतोचपणा येतो. काहीच क्रिएशन राहत नाही. वाद काहीच नाहीए. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की जेव्हा लोकांना एखादी गोष्ट इतकी आवडते तेव्हा आपण जास्त काळजी घेतली पाहिजे. ती आमची जबाबदारी आहे."
"प्रेक्षक तुमच्यावर इतकं प्रेम करत आहेत तर तुम्ही त्यांना गृहित धरु शकत नाही. मेहनत करुन त्यांना रिझल्ट द्या. सगळे एकत्र या, मेहनत करा हेच मला सांगायचं असतं. पण आता सगळं ठीक झालं आहे. सिनेमा नक्की येतोय, आधीही येणारच होता. फक्त जरा एकमेकांना फाइन ट्यून करावं लागतं. सगळेच क्रिएटिव्ह लोक आहेत. प्रियदर्शन, अक्षय, सुनील सगळेच माझे इतक्या वर्षांपासूनचे मित्र आहेत."