'तांडव' फेम परेश पाहुजाला करायचंय बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिग, पहिलं सिंगल रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 16:32 IST2021-02-08T16:25:30+5:302021-02-08T16:32:35+5:30

या म्युझिक व्हिडिओमध्ये सिंगर अकासा सिंगसुद्धा आहे.

Paresh pahuja makes singing debut with mascara | 'तांडव' फेम परेश पाहुजाला करायचंय बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिग, पहिलं सिंगल रिलीज

'तांडव' फेम परेश पाहुजाला करायचंय बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगिग, पहिलं सिंगल रिलीज

'टायगर जिंदा' आणि 'तांडव'मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता परेश पाहूजा गायक म्हणून पदार्पण केलं आहे. त्याने मस्करा नावाचं सिंगल तयार केले आहे. हे सिंगल वायुने लिहिले आणि संगीतबद्ध केले आहे. हे सिंगल स्त्रियांच्या डोळ्यातल्या मस्कारावर आधारित आहे. परेश म्हणतो की हे रोमाँटिक गाणं आहे. 

गायक होण्यावर परेश पाहूजा म्हणतो, "त्यामागची एक गोष्ट आहे. गेल्या वर्षी अकासाच्या सॉन्ग लॉन्चवेळी मी वायूला भेटलो, जसे सॉन्गच्या व्हिडिओमध्ये. आम्ही एकत्र आलो आणि फोन नंबर एक्सचेंज केले. एक दिवस मला आतून जाणवले की मला प्रोफेशनलरितीने संगीतात काम करायचे आहे. फक्त घरातील पार्ट्यांमध्येच गाणं नको होते. ही  माझी  इच्छा मी वायुसोबत शेअर केली. मी त्याला विचारले की आम्ही एकत्र जॅम करू शकतो आणि कशावर तरी काम करू शकतो. त्याने मला एका मिनिटांपेक्षा कमी वेळात मस्कारा हे गाणं पाठविले आणि मला ते आवडले. दुसर्‍या दिवशी आम्ही रेकॉर्ड केले आणि आठवड्यात गाणं तयार झाले.''

परेशने हे गाणे गायले आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये सिंगर अकासा सिंग आहे. परेश सांगतो. “विशेष म्हणजे, मी अकासाच्या पहिल्या गाण्याचा एक भाग होतो आणि आता ती माझ्या पहिल्या गाण्याचा भाग आहे. हे आयुष्याचे वर्तुळ आहे.” परेश म्हणतो, मला बॉलिवूडमध्ये गाणी गायची आहेत. माझे ऑरिजयनल साँग आहेत जे रिलीज करायचे आहे आणि माझे स्वत: चे अल्बम आहेत. ॉ
 

Web Title: Paresh pahuja makes singing debut with mascara

टॅग्स :tandavतांडव