मुलगी सारा अली खानच्या डेब्यू चित्रपटावरून पापा सैफ अली खानने कसली कंबर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 16:50 IST2018-05-24T11:18:17+5:302018-05-24T16:50:50+5:30

सारा अली खान लवकरच ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. परंतु तिचा हा चित्रपट सातत्याने वादाच्या भोवºयात सापडत असल्याने आता पापा सैफ अली खाननेच कंबर कसली आहे.

Papa Saif Ali Khan, the father of Sarai Ali Khan's debut film! | मुलगी सारा अली खानच्या डेब्यू चित्रपटावरून पापा सैफ अली खानने कसली कंबर!

मुलगी सारा अली खानच्या डेब्यू चित्रपटावरून पापा सैफ अली खानने कसली कंबर!

रा अली खानचा डेब्यू पटरीवर आणण्यासाठी आता स्वत: पापा सैफ अली खान मैदानात उतरला आहे. सारा अभिषेक कपूरच्या आगामी ‘केदारनाथ’मधून डेब्यू करीत आहे. चित्रपटात तिच्या अपोझिट अभिनेता सुशांत सिंग राजपूत बघावयास मिळणार आहे. परंतु चित्रपट बºयाचशा वादांमध्ये अडकला असल्याने तो प्रदर्शित केव्हा होणार? याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. ताज्या माहितीनुसार, ‘केदारनाथ’ ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साराने रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ हा चित्रपट साइन केला आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग तिचा अभिनेता असेल. हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान, नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये सारा अली खानला पापा सैफ अली खानसोबत अभिषेक कपूरच्या आॅफिसमध्ये बघण्यात आले आहे. या व्हिडीओनंतर असे म्हटले जात आहे की, सैफ अली खान मुलगी साराच्या डेब्यू चित्रपटाविषयी व्यक्त केल्या जात असलेल्या शंका कुशंकांवरच पूर्णविराम लावण्यासाठी अभिषेक कपूरच्या आॅफिसमध्ये पोहोचला होता. काल सायंकाळीच सैफ आणि सारा अभिषेकच्या आॅफिसमध्ये पोहोचले होते. आॅफिसमधून बाहेर येतानाचे त्याचे काही फोटो मीडियामध्ये प्रसिद्ध होत आहेत. 
 

काही दिवसांपूर्वी ही बातमी समोर आली होती की, साराला ‘सिम्बा’ हा चित्रपट मिळण्यामागे सैफचा हात होता. वास्तविक सैफने याअगोदरच स्पष्ट केले की, तो नेहमीच साराच्या पाठीशी उभा राहणार आहे. सारा अली खान सैफची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी आहे. सध्या तिच्या डेब्यूबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ज्यापद्धतीने साराचे फोटो समोर येत आहेत, त्यावरून तिच्या फॉलोअर्सची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच लग्नामधील डान्सचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 

Web Title: Papa Saif Ali Khan, the father of Sarai Ali Khan's debut film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.