Panchayat 3 : ‘पंचायत 3’ कधी येणार? अभिषेक-रिंकीचं लग्न होणार का? वाचा, काय म्हणाले दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 18:13 IST2022-06-03T18:11:31+5:302022-06-03T18:13:12+5:30

Panchayat 3 Time, Date: ‘पंचायत 3’ येणार हे कन्फर्म आहे.  प्रेक्षकही हे जाणून आहेत. पण तिसऱ्या पार्टची कथा काय असणार? रिंकीचं सचिवजीसोबत लग्न होणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास फॅन्स उत्सुक आहेत. 

Panchayat 3 confirmed The director talk on season 3 storyline Panchayat 2 | Panchayat 3 : ‘पंचायत 3’ कधी येणार? अभिषेक-रिंकीचं लग्न होणार का? वाचा, काय म्हणाले दिग्दर्शक

Panchayat 3 : ‘पंचायत 3’ कधी येणार? अभिषेक-रिंकीचं लग्न होणार का? वाचा, काय म्हणाले दिग्दर्शक

Panchayat 3 Time, Date: ‘पंचायत 2’ (Panchayat 2) या सीरिजने धुमाकूळ घातला आहे.  ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्रचंड भावली. पार्ट 2 चा इमोशनल क्लायमॅक्स प्रेक्षकांना सर्वाधिक आवडला. ‘पंचायत 2’ पाहून क्रेझी झालेले फॅन्स आता ‘पंचायत 3’ची प्रतीक्षा करू लागले आहेत. तुम्हीही ‘पंचायत 3’च्या (Panchayat 3) प्रतिक्षेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
होय, ‘पंचायत 3’ येणार हे कन्फर्म आहे.  प्रेक्षकही हे जाणून आहेत. पण तिसऱ्या पार्टची कथा काय असणार? रिंकीचं सचिवजीसोबत लग्न होणार का? प्रधानजी व मंजू देवी निवडणूक जिंकणार की हरणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास फॅन्स उत्सुक आहेत. 
अलीकडे ‘पंचायत’च्या मेकर्सनी ‘पंचायत 3’ येणार, हे कन्फर्म केलं आहे. पण कधी येणार? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पंचायतचे दिग्दर्शक दिपक कुमार मिश्रा यांनी नुकताच याबाबत खुलासा केला.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले. ‘पंचायत 3’ नक्कीच येणार. पण वेळ लागणार, असं ते म्हणाले.  

अभिषेक व रिंकीचं लग्न होणार का?
जितेन्द्र कुमार यांनी पंचायत या सीरिजमध्ये अभिषेकची भूमिका साकारली आहे. तर सान्विकाने रिंकीची भूमिका निभावली आहे. अभिषेक व रिंकीचा रोमान्स पाहायला चाहते उत्सुक आहेत. याबाबत छेडलं असता, दिग्दर्शक म्हणाले, ‘पंचायत 3 मध्ये सगळं काही हळूहळू उलगडताना दिसेल. गावाची एक प्रकृती असते. त्यानुसार, हे सगळं हळूहळू घडेल. हळू हळू सगळं काही होईल.’

गाव सोडून जाणार अभिषेक?
अभिषेक त्रिपाठी पहिल्या सीझनमध्ये परिक्षेची तयारी करताना दिसला. दुसऱ्या सीझनमध्येही तो या परिक्षेची तयारी करत असताना दाखवलं गेलं.  अभिषेक ही परिक्षा उत्तीर्ण होतो का? उत्तीर्ण झाल्यास तो गाव सोडून जातो का? अशा प्रश्नांची उत्तरं या सीरिजच्या तिसऱ्या भागात मिळू शकतात. मुलाच्या मृत्यूनंतर आतून कोलमडून गेलेला प्रल्हाद पांडे पुन्हा आपल्या जुन्या अवतारात परतेल का? हेही तिसऱ्या पार्टमधून कळू शकते.  

Web Title: Panchayat 3 confirmed The director talk on season 3 storyline Panchayat 2