ऐश्वर्या रायसारखी हुबेहूब दिसणाऱ्या या पाकिस्तानी तरूणीची होतेय सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 21:02 IST2022-01-04T21:01:46+5:302022-01-04T21:02:44+5:30

सोशल मीडियावर ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)सारखी हुबेहूब दिसणाऱ्या एका तरूणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

This Pakistani girl who looks exactly like Aishwarya Rai is being talked about everywhere | ऐश्वर्या रायसारखी हुबेहूब दिसणाऱ्या या पाकिस्तानी तरूणीची होतेय सर्वत्र चर्चा

ऐश्वर्या रायसारखी हुबेहूब दिसणाऱ्या या पाकिस्तानी तरूणीची होतेय सर्वत्र चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)ने अभिनय कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ऐश्वर्या रायचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. ती सध्या फारशी अभिनयात सक्रीय नसली तरी तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान, आता सोशल मीडियावर ऐश्वर्या रायसारखी हुबेहूब दिसणाऱ्या एका तरूणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पाहताच पहिल्यांदा ऐश्वर्या राय असल्याचे अनेकांना वाटले मात्र कमेंट्स आणि पोस्टवरून ती तिच्यासारखी दिसते हे समजले. ऐश्वर्यासारखी दिसणाऱ्या या तरूणीचं नाव आमना इमरान (Aamna Imran) आहे. ती पाकिस्तानात राहणारी आहे.

आमना इमरानने सोशल मीडियावर काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून सोशल मिडीयावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेक जण तिचे फोटो आणि व्हिडीओ पाहून ऐश्वर्या राय असल्याच्या कमेंट्स करत आहेत.

एका युजर्सने आमानाच्या फोटोवर कमेंट्स करत लिहिले की, हुबेहूब ऐश्वर्या राय सारखी दिसते…माशाल्लाह. आमना इमरान एक पाकिस्तानी ब्लॉगर आहे. आमनाचे इन्स्टाग्रामवर २६ हजाराहून जास्त फॉलोअर्स आहेत. 

Web Title: This Pakistani girl who looks exactly like Aishwarya Rai is being talked about everywhere